करावी आणि भक्तियुक्त अंतःकरणेंकरून तें पादतीर्थं
प्राशन करावें व मनांत पति हा प्रत्यक्ष शंकरच आहे
असा भाव धरावा आणि सदैव त्याचे सेवेविषयीं
उल्हासयुक्त असावें. ८ पति ज्या दिवशीं घरीं असेल
त्या दिवशी शृंगारादीक करावे नसल्यास वर्ज. ९
प्रसंगविशेषीं पति जरी क्रोधयुक्त होत्साता मर्मभेदक
भाषण करूं लागला तरी त्या वेळीं त्यास उलट
उत्तर न देतां आनंदांत असल्या वेळी प्रार्थनेनें आप-
ला जो योग्य उद्देश असेल तो त्यास कळवावा. १०
पति बाहेरून घरी येताक्षणीच हातचें काम टाकून
तो जी आज्ञा करील ती मान्य करावी आणि जेणें-
करून त्याचा आत्मा त्वरित शांत होईल अशी
व्यवस्था करावी. १९ ज्या दिवशीं पतिराज घरों
नसेल त्या दिवशीं अतिथिप्रसाद घ्यावा; किंवा
गोमातेस अन्न चालून नंतर भोजन करावें;
कारण गोमाता ही देवादिकापेक्षांही श्रेष्ठ आहे.
पृष्ठे ब्रह्मा गलेविष्णुर्मुखे रुद्रप्रतिष्ठितः ।।
मध्येदेवगणाः सर्वे रोमकूपे महर्षयः ॥ १ ॥
नागाः पुच्छे खुराग्रेषु येचाष्टौ कुलपर्वताः ॥
सूत्रे गंगादयो नद्यः नेत्रयोः शशिभास्करौ ॥ २ ॥
१२ स्वगृह स्वसामर्थ्यानुरूप नेहमीं निर्मळ राखावे.
१३ काँहीं नवीन व्रतोपोषण करणें झाल्यास
पतीची आज्ञा असल्यावांचून करूं नये. १४ लोक