पान:खानदेश मित्र.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुगृहिणी स्वकर्तव्य.

तीर्थयात्रादिकांस जातात ह्मणून हट्टानें आपणही जाऊं नये. १९ पुरुष घरीं असल्या वेळीं आपण दुःश्चित्त असू नये व पुरुष जरी दुःश्चित्त असला तरी देखील आपण प्रसन्नांतःकरण राहून त्यास शांत- वावे. १६ रजस्वला असतां मौन्य धारण करून ३ दिवस पर्यंत पुरुषमुखावलोकन न करितां चव- थ्या दिवशीं स्नानानें शुद्ध झाल्यावर प्रथम पुरुष - मुखावलोकन किंवा पुरुष घरी नसेल तर सूर्यबिंबाव लोकन करून गृहप्रवेश करावा आणि तत्कालींच पुरूषाच्या आयुष्यवर्धनार्थ कुंकुमतिलक लावाव ! आणि त्या नंतर काजळ शेंदूर कंठसूत्रादिकांच स्विकार करून सुवासिनींस तांबूल द्यावे. १७ मस्त कांच केश मोकळे ठेवून किंवा पायीं विरवल्या नसतां पावूलभरही चालू नये. १८ सूर्योदयानंतर वेणीफणी तसेच दधिमंथनही करूं नये. १९ सायंकाळी हातांत केरसुणी धरून दारी झाडीत उभे राहूं नये व केव्हां- ही झाडलेला केर घरांत न ठेवतां दूरवर नेऊन टाकावा; मात्र हातांत किंवा केरसुणीवर घालून केर टाकू नये, तसेच केर घराबाहेर अंगणांत घालवू नये कारण तेणें करून त्या घरीं लक्ष्मी कधींही प्रवेश करून सुख देऊं शकत नाहीं. २० नित्यशः दिव्यांत नवीन वात घालीत असावी व दिवा नीट करणें असल्यास काडीनें त्यास पुढें सारावा; मालविणें असल्यास वस्त्राचा फटकारा किंवा तोंडाचा फुंकर घालून मालवू नये. २१ शेजारीण, रजक स्त्री, कुंटीण, आणि दरिद्री जैन स्त्री ह्यांच्याशी स्नेह संपादन करूं नये; केला