पान:खानदेश मित्र.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुगृहिणी स्वकर्तव्य.

असतां हानी होते. २२ जी स्त्री स्वपतीची निंदा करीत असेल तिशी आपण भाषण सुद्धां करूं नये कारण त्यायोगें तिचे दोष तत्काळ आपले माथीं . बसतात. २३ सासु, सासरे, नणंद, दीर, इत्यादिकांचा त्याग करून निराळे राहण्याचें कधीं मनीं वागवूं नये. २४ सासरचे गुह्य लोकांत किंवा माहेरी जाऊन उघड करूं नये. पतीचें मन आकर्षण व्हावयाकरितां सासरच्या माणसांबद्दल नसत्या कागाळ्या कल्पून त्यास सागू नयेत; कारण तो त्रासून निराळा ' झाल्यास वडील माणसें घरांत जीं असतील त्यांच्या सेवेविषयीं परांग्मुख झाल्याचा दोष आपले मार्थी बसतो है नेहमी लक्ष्यांत वागवावें, २५ अडोशाच्या ठिकाणी सुद्धा पडदणी आड केल्या विरहित नम्रपणी अंग धुऊं नये. २६ सासु सासरे इत्यादि वडील माण- सांची आज्ञा सदैव ग्रहण करीत असावी; मात्र ती ग्रहण केली असतां आपल्या पातिव्रत्यधर्मास जर फांटा बसण्याचा संभव असेल तर कदाचित् तो न केली तरी चालते. परंतु तशी चिकट आज्ञा पतीनें केली असतां मात्र तिचा अहेर करतां कामा नये. ! ! २७ उखळ, मुसळ, दाराचा उंबरा ह्यां वर बसूं नये. २८ पति जरी दरिद्री असेल तरी पण त्याची केव्हां- ही आज्ञा भंग करूं नये. फार तर काय पति लंगडा, पांगळा, आंधळा, बधिर, कुरूप, कृश व्याधिग्रस्त, कुकर्मी, मूर्ख आणि तृतीय प्रकृतीत मोडणारा असा कां असेना पण त्यास पूज्यच मानिलें पाहिजे. २९ त्याच्या इच्छेनुरूप जी लेणी लुगडीं देईल त्याचाच