पान:खानदेश मित्र.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुबोधवचन संग्रह.

 १ ह्या लोकीं अशाश्वत तर सारेच; पण स्वकर्त- व्याला केव्हांही पराङ्गमूख होऊ नये. २ देवाप्रमाणें सर्वं कांहीं मिळेलच, परंतु यत्न करावयास विसरूं नये. ३ कोणत्याही कार्यास हात लावण्यापूर्वी त्या- च्या अथतीचा पूर्ण विचार करावा; हात लावल्या- वर मध्यंतरीं विघ्नं येतील त्यांस न जुमानतां आपला क्रम सुरू ठेवावा, आणि सोडणेच भाग आलें तर मागाहून सोडल्याचा पश्चात्ताप केव्हांही होणार नाहीं, ह्याची चिकित्सा शांतपणाने करावी. ४ उतावळेपणा कोणत्याही कामांत करूं नये व 'धीर- 'सो गंभीर ' असे लौकिकांत ह्मणतातही. परंतु काळ वेळ तशीच असल्यास हयगय करूं नये. ह्मणजे भ लत्याच वेळी ' धीरसो गंभीर ' ह्या वचनाचा उप- योग करूं नये. ९ ईश्वरदत्त स्थितींतच समाधानीत असार्वे, पण पशुपक्ष्यांदिकां प्रमाणे पूर्वापार चालत आलेल्या चालीरीतींत बदल करूं नयेच असा हेका धरूं नये; कारण मनुष्य प्राणी पशुपक्ष्यांदिकां प्रमाणे उपजत ज्ञानावरच निर्वाह करणारा असावा असा कांहीं ईश्वरी संकेत नाहीं तर त्यास ज्ञान हे स्वतः " च्या आकलन शक्तीवर हवे तितकें वाढवितां येऊन त्यानें आपली स्थिति सुधारण्यास त्या ज्ञानचक्षूंचा उ- पयोग करावा अशी मुळींच व्यवस्था करून ठेविली आहे!! ६ आपले पूर्वज ( वडील ) ज्या मार्गानें सं-