पान:खानदेश मित्र.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुबोधवचन संग्रह.

सार प्रपंच रेटीत होते तोच मार्ग आपण धरावा. परंतु वर्तमानकाळी आपली स्थिति जर भिन्न असेल तर मा- त्र त्या वर्तनाचा त्याग करून ह्या काळास उक्त अ- सा मार्ग स्वीकारावा. ७ माझे वडील श्रीमंत होते व त्याना दुसन्याच्या घराची पायरी चढण्याचें देखील कारण नव्हते ह्मणून आपण जरी आतां दरिद्री आहों तरी कायतो बाणा सोडावा है हाणणे किती चांगले. आहे !! ! !, ७ दरिद्र प्राप्त झाले तरी धैर्य व सत्व ह्रीं केव्हांही सोडूं नयेत. कारण या दोहोंचा त्याग केल्यास दरिद्रावस्थेत आपला निभाव लागणे कठीण. ७ आपणास मित्र असावे असें वाटत असेल तर स त्यवादी व मिष्ट भाषणी असा हो ! आणि मित्र कर-णे तो त्याचे मानसिक शुचिर्भूततेच्या अधिक उणेपणाचा विचार पाहून कर. कारण सन्मित्र साह्य असतां जित- का हितकारी होतो तितका किंबहुना प्रतिकूळ झाला. असतां अधिक घातक होतो. असें कां तर आपले अति गुह्यही त्यास माहीत असल्यानें तो तें प्रतिकूळ झाला असतां लोकांपुढे मांडतो. ९ प्रत्येक कार्यसिद्धीला तूं परसाह्यापेक्षां स्वसाह्यावर ज्यास्त अवलंबून ऐस हा- णजे तें निश्चयाने सिद्ध होईलच ! ! १० तूं कितीही शहाणा विचारी असलास तरी प्रत्येक गोष्टींत दुसऱ्या श्रेष्ट मनुष्याचें ह्मणा किंवा लहानाचें म्हणा मत घे त जा. परंतु ज्याचें मत घ्यावयाचें त्याचें लोकांत वर्तन कसे काय आहे ह्या गोष्टीकडे चांगले लक्ष्य पुरवीत जा. निदान तुझ्या विषयीं तरी त्याचें मत ने- हमी कसें असतें ह्मणजे नेहमी तुझ्या बन्या विषयीं