पान:खानदेश मित्र.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



श्री.
वृषपर्वा वधकथन. *
आर्या.

वृषावें या नावे ।
असुरेंद्र एक जगति माझारी ॥
तद्यश थोरीव किती ।
स्पष्टचि देवेंद्र वदत अस्मंदरी ॥ १ ॥
कष्टविले बहु नष्टचि ।


 * पूर्वी दैत्यांचा राजा वृषपर्वा नामे एक असुर मोठा बली होता, त्यानें आपल्या बाहुबळानें देवादिकांस फारच त्रस्त करून सोडलें होतें. कारण दैत्य गुरू जो शुक्राचार्य त्या जवळ अमृतसं- जीवनी असल्यामुळे त्यानें स्वपक्षीय जनांस रणीं ते मृत होऊन पडतांच पुन्हां सजीविल आणावें आणि तेणेंकरून दैत्यभार कायमच राही; देवांस ती विद्या अवगत नव्हती त्या मुळे वारंवार त्यांच्या सैन्याचा विध्वंस होऊन सर्व देव वस्त झाले व पुढें बराच काल पावेतों तो असुरेंद्र देवांस अजिंक्य असा शत्रु होऊन राहिला होता; ह्मणून आणि शुक्राचार्यानें मेघांचे आकर्षण केल्याने १२ वर्षे पावेतों पृथ्वीवर त्या सुमारास अनावृष्टि झाली होती ह्मणून सर्व उध्वस्त झालेली पृथ्वी शांततेप्रत पावावी या दोहो कारणा करितां ब्रह्मदेवाच्या सूचने वरून इंद्रानें दशरथ राजास स्वर्गी आणवून त्या दुष्ट दैत्याचा त्याच्या हस्तानें नाश कर- विला वगैरे कथा रामायणांत आहे त्या आधारें हें वरील कथानक रचलें आहे.
 $ त्याच्या यशाची थोरवी काय सांगावी ? इंद्र देखील हा मला एक अजिंक्य शत्रूच उत्पन्न झाला आहे असें ह्मणत असे.
 १ माझा शत्रु'