पान:खानदेश मित्र.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वृषपर्वा वधकथन.

खळकृतिला देवभार समुळदेरें ॥
तत्साह्यार्थ कौव्य शिरे ।
गोहनना विपिनि व्याघ्र*काळ-दरे ॥ २ ॥
काव्य स्वकरी जलदै हत ।
नावर्षे विफलयत्न सुर यांचे ॥
चिंताक्रांत मनीबहु |
शचिरैमणा ब्रह्मदेव सुर याञ्चे ॥ ३ ॥
नाना यत्नी न करीं ।
ये अंबुँद त्रस्त भाग महिवरला ||
अत्यंत तीव्र तपनें ।
तृणकणकी समुळ भाग हारवला ||४||
गो ब्राह्मण पिडिताच ।
खर्गकुल की वनपंदितसे झालें ॥
उध्वस्त मेदिनीती ।
गतधैव कामिनि जारी चाले ॥ ५ ॥
व्हावी वृष्टि सुवेळीं ।
सुख तेणे होई धेनु विप्रांसी ॥
यज्ञादिक सत्कर्मे ।
करूनि सुरां मौदै देति वि-प्रौशी ॥६॥


 * गाईचे प्राणहरण करण्यास उत्सुक अशा सिंव्हानें जसे व्याघ्रास तूं मला मदत कर ह्मणून अर्जवानें प्रार्थिलें असतां तो स्वप्राण रक्षणार्थच भयानें त्यास साथ करितो तद्वत स्वनाश न व्हावा ह्मणून शुक्राचार्य त्या दुःष्ट राजाच्या आश्रयाला राहिला होता.
 १ दुःष्टाची कृति २ भयभीत होई 3 शुक्राचार्य ४ मेघ ५ इंद्र ६ प्रार्थी ७ मेघ ८ पक्षीकुल ९ वृक्ष १० विगतधवा ११आ नंद १२ हाविर्भाग ग्रहण करून