अवश्य घ्या !!
हें मा० पु० मार्च १८९ २३० पासून सुरू झाले असून हा
आजचा त्याचा प्रथमांक आहे. या पुस्तकांत नाटकें, कादंबऱ्या
चातुर्याच्या गोष्टी, अद्भुत कथा, मनोरंजक कविता, शूरपुरुषांची
व देवादिकांची चरित्रे स्थलवर्णन, विनोदपर चुटके, लोकोत्तर
चमत्कार, कधीही छापून प्रसिद्ध झाले नाहीत अशा पुराण ग्रंथां-
तील क्रमश: गद्यरूपानें सार, निवडक देशी औषधें, ठिकठिकाणचे
नवल विशेष वर्तमान, सुबोधवचनसार संग्रह, ऐतिहासिक माहिती
पुस्तकावरील अभिप्राय इ० इ० अनेक विषय येत जातील; त्याच-
प्रमाणे कोण हरएक प्रकारच्या उपयुक्त विषयांवरील लेख, पत्र-
व्यवहार, ( ह्यांत एक व्यक्तीस अनुलक्षन निंदा किंवा स्तुति के-
ली असता कामा नये. ) कूरें, सुभाषितें पाठविल्यास त्यांचाही
समावेश केला जाईल. ( कूटें व सुभाषितें ही पूर्वी कधीही
छ. पून प्रसिद्ध झालेली नाहीत. अशीच असावीत ) आजला
जरी ह्मा मा० पु० २४ पृष्ठे दिली आहेत तरी एक तिमाही-
च्या आंतच जर ५०० वर वर्गणीदार मिळाले तर ती लागलीच
३६ पावेतों करूं ! सारे होणे जाणे आश्रयदात्यांच्या मजवर अ
वलंबून आहे. करितां महाराष्ट्र भाषाभिज्ञ प्रत्येक कटुंब प्रमुख मनु-
यांनी या गोष्टीकडे अवश्य लक्ष्य पुरवून त्यास देतां येईल तित
का उदार आश्रय द्यावा व ते तसें करितील अशी मला पूर्ण
आशा आहे.
विशेष सूचना -- हा प्रथमांक आह्मी नमुन्यादाखल स्वतः
च्या खर्चाने पोष्टमार्फत पुष्कळ सूज्ञ व वाचनप्रिय सद्गहस्थांकडे
पाठविला आहे. परंतु पुढील अंक, वर्गणी ट० हा० सह आगा-
ऊ आल्यावांचून कोणांसही पाठवितां येण्याची सवड नाही. त्या-
स्तव ज्यांस है मा० पु० सुरू ठेवणे असेल त्यांनी अंक पावल्या
दिवसा पासून १५ दिवसांचे आंत वर्गणी मेहेरबानीनें पाठवून द्या-
वी. किंवा घेणें नसल्यास अंक ८ दिवसांचे आंत परत करावा.
दोन्ही तजवेजीतून एकही जे करणार नाहीत त्यांजकडे आमचे ते
कायमचे वर्गणीदार असे समजून दुसरा अंक व्या० पे० नें (१४५)
पाठविला जाईल.
डि० ही ० पुराणीक.