पान:खानदेश मित्र.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रंजन आणि सुबोध.

लध्वांशोपांश न जावा. !! इतकी कांहीं ह्या द्रव्या- च्या ठायीं मनुष्य मात्राची आस्था असते व ह्या द्र- व्याकरितां मनुष्य हवें तें कर्म करावयास तत्पर अ- सतो, दुसऱ्याचा जीव घेण्यास किंवा स्वतःचा देण्या- स देखील वेळेवर कोणी कमी करायचें नाहीं. सारांश गांठीं द्रव्य असले ह्मणजे हवी ती गोष्ट आपणास सा- ध्य होण्यास कांहीं जड होत नाहीं. दरबारचा न्याय सिद्ध करण्यासवरण्याला वगैरे सरकारच्या कृपेंतील जे वकील लोक वगैरे ह्यांची मर्जीच खूष प्रथम असली पाहिजे व तो द्रव्यावांचून अन्यत-हेन होऊं शकत नाहीं, यास्तव दरवारचा न्याय स्वइष्ट हेतु साधन तत्पर होई पावेतो नेहमीं कंबरीं द्रव्याचा कसा बांधलेला असलाच पाहिजे!
 खपक्ष पुष्ट पुरावा -- आपली गोष्ट कितीहि ख- री असो, आपण मोठ्या सत्याला स्मरून ती सांगत असूं तथापि ती आपल्या पाठिराख्या अर्थात सा- क्षीदारांच्या तोंडून श्रवण केल्यावांचून असत्यच भासावयाची किंवा भासलीच पाहिजे असा सिद्धांत असल्यामुळे आपणास दरवारी न्याय स्वतःला अ नुकूल असा मिळण्यास हा साक्षीदाररूपी पाठिरा- स्वा पुरावा अवश्य साह्य असला पाहिजे. त्या वांचून आपले कार्य केव्हांही सिद्ध होणें नाहीं !! द्रव्य सामर्थ्य असले ह्मणजे हा पुरावा वगैरे सर्व कांही मिळतो, परंतु पुरावा असावाच है मात्र सिद्ध झालें !!
 ४ सत्यावर निष्ठा -- जगन्नियंत्या परमेश्वरास सत्य हैं फारच प्रिय आहे, ह्मणून कोणत्याही कृत्यांत