या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल/५३ सहा : पाच कविता लाडके, हे चार दिवस फक्त तुझे-माझे आहेत. पदराखालून तुला पाजीत होते, भोवताली किती माणसें होती, पण तूं आणि मी एवढेच एकत्र होतो. अगदी तशीच आपण आज असू ये. भोवताली तिन्हाईत आहेत, पण त्यांची जाणीव नाही, त्यांची अडचण नाहीच. आज तूं पांघरूण घेतले आहेस झाकण लावून घट्ट बंद केले आहेस दरवाजा लावून टाकला आहेस ठोठावलें म्हणजे उघडते म्हणतात मी केव्हाची ठोठावतें आहे, - तुला ऐकू येते आहे ना?