या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ५७ बरं का, माईअरे, ह्याला इतक्या वर्षांत आजच का आठवण झाली? माईही तर आईची हाक बये, आजच कां बरं आलीस? उत्तर कां देत नाही तुम्ही? आणखी कोण बरं ही पलीकडे डोक्यावरून पदर ओढलेली? बाई नाही, बुवाच दिसतसो आहे, कपाळावर टोपी किती ओढली आहे - ओळखूच येत नाही. मी जवळ आले आहे, वाकून पाहते आहे. हात धरले आहेत, पण तोंडच दिसत नाही, पण हातात हात आहेत आणि त्या हातांतून दुःखाचे लोट माझ्यात येऊन थडकताहेत, मला हे दु:ख सोसवत नाही, त्याची कळ माझ्या छातीत येऊन मला जागी करते.