या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ | गंगाजल "हं!" “म्हणजे काहीही कृती केली, अगदी समजून-उमजून, विचारानं केली, तरी ती योग्य होईलच, असं नाही. कधी बरोबर झाली. तरी तीमध्ये । थोडीबहुत चूक राहणारच.” मी त्रासून विचारलं, “मग काहीच कृती करू नये, असंच ना? उत्तर नाही. माझं मलाच उत्तर शोधलं पाहिजे. "जिवंत आहे, तोवर कृती व विचार होतच रहाणार. दोन्ही आपल्याशी इमान राखून करायच्या. अपूर्णत्वामुळं काय चुकेल, त्याचं फळ भोगायला व हळहळ करायला सबंध आयुष्य आहेच की!" उत्तर नव्हतं; पण मागचा ससेमिरा थांबला होता. १९६९