पान:गच्चीवरील गप्पा.pdf/६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आर्थिक स्पर्धा.

उपयुक्त शिक्षणाचा विचार तर वाजूसच राहिला. मुलांपेक्षां आम्ही सूत- भरहि कमी नाहीं हें दाखविण्याच्या ईष्येनेंच त्या शिकत असतात. प्रो. कर्वे यांची उपयुक्त संस्था सोडून पुरुषी कालेजांत मुलींची जी रेटारेटी होत आहे ह्यावरून वरील अनुमान दृढ होतें. ह्या बी. ए. झालेल्या मुली आपल्या नवऱ्यांवरोवर शेक्सपीअरच्या गुणावगुणांची चर्चाच करीत बसणार काय ? ह्याच शिक्षणाची कां समाजाला आज जरूरी आहे ? पुरुषांचा मार्ग वेगळा, स्त्रियांचा वेगळा. मग दोघांची एकाच रुळावरून -गाडी नेण्यांत कोणतें हित आपण साधतों ? पुरुषी कालेजांत गर्दी कर णा-या मुलींच्या सुशिक्षित पित्यांच्या बुद्धिमांद्याचे आणखी बलवत्तर प्रमाण तें काय पाहिजे ? ' गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः ' हैं त्रिकालाबाधित सत्य दिसतें. कित्येक लोक आपल्या मुलीस श्रीमंत स्थळ मिळावें एवढ्याच उद्देशानें एम ए. करतात. जणूं काय श्रीमंत अगृही आणि संतानहीनच असावयाचे.
 युरोप व अमेरिका खंडांत स्त्री ही पुरुषांप्रमाणें स्वतंत्र आहे अशा • कल्पनेनें ती पुरुषावरोवर आर्थिक स्पर्धा करीत असते. व ह्या पैसे मिळ- विण्याच्या झटापटीत यश येण्याकरतांच पुरुषाप्रमाणेच ती बौद्धिक शिक्ष- णाच्या मागे लागतें. आतां विवाह व संसार र्हेच जर स्त्रियांचे अंतिम साध्य, आणि विवाहोत्तर स्त्रियांचा आर्थिक पृथकपणाच जर रहात नाहीं, तर स्त्रियांनी ह्या उदरंभरी विद्येचा हव्यास तरी कां धरावा ? विवाहसमयीं स्त्रीच्या जीवनाची हमी पुरुष घेतोच. विवाह होतांच पोट कसें भरेल . ह्या चिंतेंतून ती कायमची सुटते. असें असतां नोकरी करून पोट भर- याचे ढंग स्त्रियांना कां सुचावेत हें कोर्डे सुटत नाहीं. आमच्या स्त्रियां- चीहि ह्या मोहानें फसगत होणार आहे. स्त्रियांना प्रथम नोकऱ्या द्या; ह्या गरभार राहिल्या म्हणजे त्यांस काम न करतां पगार द्या; प्रसूती- -नंतर त्यांना फुकट पोसा; असे एक ना दोन किती कायदे करावे लागणार ?

५७