पान:गच्चीवरील गप्पा.pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
एकत्र कुटुंबाचे दिवस भरले.

ג, धार्मिक कृत्यांचा बोजवारा उडाला. ह्याचा परिणाम म्हणजे भिक्षुकवर्ग नायनाटाच्या मार्गाला लागला. धार्मिक क्रियांचा लोप तर झालाच, पण अधर्म म्हणून न मानल्या जाणाऱ्या आचारानें ही धर्माची जागा पटका- वली. कारण रजस्वला भायेच्या हातचें खाल्ले नाहीं तर उपाशी राहण्याचा प्रसंग येतो तो कसा टळणार ? एकट्या स्त्रीला घरी टाकून पुरुष दूरवर कसा जाणार? अर्थात् त्याच्या कर्तृत्वाला प्रतिबंध झाला. कार्यवशात् देशांतरीं गेलेल्यांच्या स्त्रियांकरतां सरकारानें एक “ प्रोषितभर्तृका गृह उघडण्याची सूचना अद्यापि कोणी केली नाहीं ह्याचेंच आश्चर्य वाटतें. आजपर्यंत घरोघर सूतिकागृह असे; रुग्णालय असे; पदार्थ तयार कर- ण्याचे कारखाने असत. आतां ह्या गरजा बाहेरून भागवून घ्याव्या लाग- णार. अशी राहणींत विलक्षण क्रांति परिस्थित्यनुरूप होत असते. अवि- भक्त कुटुंबपद्धति चांगली किंवा वाईट हा सध्यां प्रश्नच नाहीं. चांगली असो वा वाईट असो, विद्यमान परिस्थितींत ती जीव धरून राहणें शक्य नाहीं. एकत्र कुटुंबाची चाल सर्वस्वी गुणयुक्त नसली तरी तांत बरेच फायदे होते. सर्व गुण एकत्र कोठें आढळतात ? "नैकत्र सर्वो गुणसंनि- पातः ”. समाजांत क्रांति घडणार; ती घडणें न घडणें हें आपल्या आवां- क्याच्या बाहेर आहे. नवीन नवीन शास्त्रीय शोध व आर्थिक स्थित्यंतरें ह्यां- मुळेच मोठमोठ्या उलटापालटी होत असतात. ह्या बदलेल्या परिस्थि- तीला अनुसरून धर्मशास्त्रहि बदलावें लागतें, त्यास उपाय काय ? “शास्त्रे नृपे च युवतौ च कुतः स्थिरत्वम् " ? शास्त्राला स्थिरत्व नाहीं हैं म्हणण्याचा हेतु हाच. हल्लींचें एकत्र कुटुंब म्हणजे कायदेशीर विभक्त न झालेलें एवढाच त्याचा अर्थ. एकत्र कुटुंबाचें स्वारस्य कधींच निघून गेलें आहे.अविभक्त कुटुंबांत सर्वांचा पैसा एकत्र असतो. त्यामुळें लहान मोठा धंदा करण्यास घरचें भांडवल होतें. प्रत्येक घर अशा दृष्टीनें पाहिलें असतां एक प्रकारची पेढीच होय. यामुळें गांवोगांव पूर्वी पेढया