पान:गच्चीवरील गप्पा.pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

येत नाहीं. केर काढण्यापासून तों पैसे विल्हेस लावण्यापर्यंत प्रत्येक कामाला कोणीतरी धनी पाहिजे. खर्चाचें काम म्हणजे कोणाचेंच काम नाहीं ह्यामुळे अनास्था होते. पण काम करावेंच लागतें म्हणून तें कर- प्याचा बोजा एकट्या कर्त्यावरच पडतो. बायकांनी गृहकृत्यें आपसांत वांटून घ्यावीं तशीच पुरुषांनीहि बाहेरील कामांची वांटणी करावी. शेती, सावकारी, घरें, घरखर्च, स्वच्छता, आरोग्य, मुलांमुलींचे शिक्षण ह्यां- पैकीं एकेक काम कुटुंबांतील मनुष्याने उचललें तर ह्या संघशक्तीच्या कार्यानें कुटुंबाचें कोटकल्याण होईल. एकएकटे राहून काम करण्याला जी संधि मिळत नाहीं ती समाइक कुटुंबांत अनायासें प्राप्त होते. ब्राह्म- णांना तर इतःपर नोकरीच्या क्षेत्रांत वाव नसल्यामुळे एकत्र कुटुंबांचे फायदे त्यांनीं व्यर्थ दवडूं नयेत. विभक्त असून एकत्र राहाणें हेंच आपलें ध्येय असावें. वेगवेगळीं माणसें एकत्र होऊन उद्योग धंदे चालवीत नाहींत काय ? मग एकाच हाडारक्ताच्या माणसांनीं सरकतीनें धंदे करण्यास काय हरकत आहे ? आमचें चुकतें तें हें कीं, आर्थिक हितसंबंध आम्ही तुटक करीत नाहीं. समाइक कुटुंब म्हणजे अनेक गुणार्जनाची शाळा होय. परंतु कोणालाहि सुव्यवस्थित रीतीनें कुटुंब चालवतां येत नाहीं. दोघां भावांना जमवून घेतां येत नाहीं. त्यांनी देशाची एकी घडवू आण- ण्याच्या भानगडीत पडणें हास्यास्पद नाहीं काय ? " संहतिः श्रेयसी राजन् विगुणेष्वपि बंधुषु " हें वचन कांहीं अगदींच शून्य नाहीं. राज्य- कर्त्यांना ज्याप्रमाणें पोलीस, गुप्त पोलीस ठेवावे लागतात त्याप्रमाणे कुटुंबचालकानेंहि करावयास पाहिजे. घरांत परकीय मनुष्य कोण आलें, केव्हां गेलें, ह्यावर सूक्ष्म नजर ठेवणारा प्रत्येक घरांत कोणीतरी जबाब- दार मनुष्य असणें अगत्याचे आहे. सांप्रत आमचें कुटुंब म्हणजे बेशिस्त- पणाचें टळटळीत उदाहरण होय. समाइक भांडवलावर व्यापार करणाऱ्या मंडळीप्रमाणे एकत्र कुटुंबाचेहि जमाखर्च ठेवले गेले व दरसाल वर्षअखे-

७६