पान:गद्यरत्नमाला.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
गद्यरत्नमाला


युद्धांत पराक्रम, कीर्तीची आवड, विद्येचें व्यसन, हीं मोठ्यांच्या अंगीं स्वभावसिद्ध असतात.
 गुप्तपणे दान करणें, कोणी घरीं आला असतां आदरसत्कार करणें, दुसऱ्याचें बरें केलें तरी न बोलणे, आपल्यावर कोणी उपकार केला तर तो मात्र चौघांत सांगणें, लक्ष्मी असतांहि गर्व नसणें, दुसऱ्याची वाईट गोष्ट न बोलणें हें तरवारीच्या धारेसा- रखें तीव्र व्रत साधूंस कोणी सांगितलें ?
 हस्ताच्या ठायीं दातृत्व, शिराच्या ठायीं थोरांविषयीं नम्रता, मुखामध्यें सत्य भाषण, बाहूंमध्ये मोठा पराक्रम, अंतःकरणांत स्वस्थता, कर्णानीं शास्त्रश्रवण, हीं संपत्तीशिवाय स्वभावतःच जे मोठे आहेत, त्यांचीं भूषणें होत.
 ऐश्वर्यात असतां थोरांचें अंतःकरण कमलपत्रासारखें कोमल असते; तेंच विपत्कालीं पाषाणासारखें कठीण होतें.
 तापलेल्या लोखंडावर पाणी पडलें तर त्याचा मागमूस देखील राहत नाहीं. तेंच कमलपत्रावर पडलें तर मोत्यांसारखें शोभतें. स्वाती नक्षत्राच्या वेळेस समुद्रांत शिंपीमध्ये पडलें तर तेंच मोतीं बनतें. यावरून असें दिसतें कीं, उत्तम, मध्यम, कनिष्ठ, हे गुण संगतीच्या योगानें उत्पन्न होतात.
 आपल्या सदाचरणानें बापास संतुष्ट करतो तोच पुत्र, जी भर्त्याचे हित इच्छिते तीच बायको, संपत्तींत आणि विपत्तींत सारखा असतो तोच मित्र, हीं तीन जगांत पुण्यवान् असतात त्यांस मिळतात.
 लवून उंच होतात, दुसऱ्यांच्या गुणांचें वर्णन करून आपले गुण प्रसिद्ध करतात, दुसऱ्यांसाठी अनेक प्रकारचे यत्न करून स्वार्थ साधितात, न बोलतां सहन करून निंदायुक्त कठोर भाषण . करणाऱ्या दुष्टांस दोष लावितात, अशा साधूंचे आचरण आश्चर्य- कारक होय; हे जगांत कोणांस पूज्य नाहींत ?
 फळें आलीं झणजे वृक्ष लवतात, पाण्याच्या योगानें ढग लोंबू