या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
गवळ्याच्या कन्येची गोष्ट
देवाच्या ख-या भक्तांचे स्वभाव आणि वर्त्तणुकी यांकडे लक्ष लावून त्यांचे सद्रूण कसे वाढतात, हे पाहावयास आनंद वाटतो. बहुतेक गरीब लोकांच्या अंत:करणांस ईश्वरी कृपेचा उदय प्रकाशित करितो आणि त्यांमध्ये खीस्ताची प्रतिमा पवित्रात्म्याकडून प्रतिबिंबित होती, हें पाहन फार संतोष होतो. पारमार्थिक होण्यास जितक्या अडचणी श्रीमंत लोकांस पडतात तितक्या गरीबांस पडत नाहीत, म्हणून त्यांचे साळसूदपण व भोळेपण चांगले दिसून येतें. द्रव्य, मोठेपण, आणि श्रीमंत सोबती यांच्या योगाने खीस्ताला अंगीकरण्या विषयीं पुष्कळ अडचणी प्राप्त होतात. तथापि कितीएक देवाच्या कृपेने आपला अभिमान व