पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/22

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सगुणों व उपदेशक यांचें संभाषण. 1°、 आहे, असें मला वाटले. हे सद्रूण म्या अधिक चांगले समजावे ह्मणून ईश्वराने माझें येणें सफळ करावें असो, म्यां प्रार्थना केली. सगुणी ह्मणाली, 'महाराज, आपण आमच्या झोपडींत यावें असे आह्मी योग्य नाहीं. आपण इतके लांबून आह्मास भेटण्यासाठीं आलां यावरून आही फार उपकार मानितों.” उप०-'आमचा धनी यापेक्षांहि फार लांबून आह्मा पाप्यांला भेटायास आला. तो अापल्या बापाचा ऊर व आपलें गौरव सोडून या जगांत दयेच्या आणि प्रोतीच्या कामावर आला. आणि आह्मी याला अनुसरतों असें जर ह्मणतों, तर आह्मीहि त्यासारिखींच एकमेकांचीं दु:खे सोसावीं आणि सर्वांचे हित पाहावें, हे येग्य आहेना ?” इतक्यांत तो ह्यातारा आंत आला, आणि याने पुन्हा माझें फार आगतस्वागत केलें. मग लवकरच कन्येच्या मरणविषयीं संभाषण होऊं लागलें. तेव्हां सगुणीच्या संभाषणावरून तिचा