पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/23

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*R o गवळ्याच्या कन्येच गोष्ट. स्वभाव धार्मिक व चांगला आहे, असें माझ्या दिसण्यांत आले. 'खीस्ताने मजवर केवढी दया व प्रीति केली आहे, म्यां ईश्वराचे उपकार मानून त्याचें गौरव आणि काम यांविषयीं क्रिती तत्पर असावें ?'अस्या तिच्या बोलण्यावरून तिची चांगली बुद्धेि व उत्तम रीति पाहून मला आश्चर्य वाटलें. माझें येणें तिला व तिच्या आईबापांला सफळ व्हावें ह्मणून ती फार उत्कंठित आहे असो दिसली. तथापि तिची वर्तणूक अमर्यदिची किंवा मतलबी नव्हती. तिजमध्यें ख्रिस्ती मनुयाची स्थिर बुद्रेि व आस्था आणि ख्रियेची मर्यादा व कन्येचें आज्ञाधारकत्व हे गुण होते. तिचा स्वभाव व संभाषण हीं शुभवर्तमानाप्रमाणेंच आहेत हैं समजल्यावांचून तिच्या संगतीं कोणाच्याने राहवेना. ती आपल्या आईबापांच्या ध्यानांत खरें ज्ञान आणि अनुभव आणून द्यावयास किती उत्कंठित होती आणि तिचे प्रयत्न किती सफळ झाले होते हे लवकरच माझ्या समजण्यांत आलें. हें तरुण