पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/35

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ー、 गवळ्याच्या कन्येची गोष्ट . म्यां देवाची प्रार्थना कधीं केली नाहीं. परंतु चांगली अत्रू मिळवावी ह्मणून फार वाईट आचरण मात्र केलें नाहीं. खरा देव व खोस्त जो तारणारा त्याची कांहीं ओळख मला नव्हती. मी | तारणाविषयीं निष्काळजी होतें, आणि जर त्या वेळेस मेली असते तर खचीत नरकांत पडले 27 ܠ 3. उप०-'ज्या उपदेशाकडून देवाच्या कृपेने तुझें मन पालटलें तो ऐकून किती वेळ झाला?” " स०-‘सुमारें पांच वर्ष झालीं.” उप०-‘हें कसे घडलें ?” स०-“कोणीएक मिशनरी साहेब येऊन उपदेश करणार आहे, असें म्यां ऐकिलें. आणि आपण जाऊन तो उपदेश ऐकावा, असें माझ्या मनांत आलें. परंतु बहुत लोकांनों सांगितलें की तूं जाऊं नको, तो लोकांस बाटवितो. तथापि आपले नवें लुगडे लोकांस दाखवावें आणि गमत पाहावी, या हेतूने मी गेले. खचित सांगतें महाराज, जाण्यास यापेक्षां चांगला हेतु नव्हता,