पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/47

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

፲፰ነፉ गवळ्याच्या कन्येची गोष्ट. मला मोलवान वचने देती. तेणेंकरून मला शक्ति व समाधान होते . आणि तो मला तारा- । याला शक्तिमान व खुशी आहे, याविषयीं कांहीं संशय राहत नाहीं. मी त्याच्या हातांत आहे, आणि तेथें राहायास इच्छितें. तो मला कधीं सोडणार नाहीं, परंतु तारीलच तारील असा भरवसा आहे. त्याने मजवर प्रीति केली आणि मजसाठीं मरण सोसिलें. त्याची देणगी व बोलावणें पालटत नाहीं अरी माझी खातरी आहे. ही आशा धरून भी जगत आणि होंच आशा मरणसमयों धरावी, असे मी इच्छितें.” याप्रमार्ण तिर्चे बोलणें ऐकून मला वाटलें कीं 'हें खचित देवाचें घर आहे, आणि हा आकाशाचा दरवाजा आहे.' चहूंकडे पाहिलें, तीं सर्व स्वछ व निर्मळ व मनोरंजक दिसलें, आभाळ कांहीं भरले होतें, परंतु मावळणा-या सूर्याचे किरण त्या खोलींत अकस्मात चकचकोत प्रकाशले, आणि भिंतीकडल्या तक्यावरील जस्ती व दुस-या प्रकारच्या पांढ-या पात्रां