पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/48

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपदेशक आपल्या घरीं जातो. YAR वर पडण्याकडून प्रतिबिंबित झाले. या मावळणा-या सूर्याचे चमकणें, हे या तरूण ख्रिस्तिणीच्या शांत व सुखाच्या मरणासारिखे आहे, असें दिसले. एक कवडसा लहान आरशांतून तिच्या तोंडावर पडला आणि तिच्या चेहयावरून संतोषवृत्ति, पूर्ण भरवसा आणि नम्रता हीं दिसून आलीं. आणखी कांह संभाषण झाल्यावर म्यां त्यांबरोबर प्रार्थना केली व सलाम करून माझ्या घरीं येण्यास निघालों. तेव्हां दिवस मावळत होता आणि सर्व निवांत दिसलें. गुरांचें हळू हंबरणे, वाड्यांत कोंडलेल्या मेंढरांचें बे बे करणें, रात्रिंचर जीवांचे गुणगुणणें, समुद्राची दूरची गर्जना, दिवसांतील पक्ष्यांचे शेवटील स्वर आणि बुलबुलांचे पहिलें गाणें, हीं सर्व माझ्या कानीं पडलीं, आणि यामुळे तो संध्याकाळ फार रमणीय दिसला. तेव्हां माझ्या मनांत गंभीर विचार उत्पन्न झाले. देवाच्या कामावरून त्याच्या शास्त्राविषयीं चांगले दाखले मिळतात.