या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

सुरेख चालतो, अशी खातरजमा झाल्याशिवाय शाळांत ब्राह्मणेतरांच्या मुलांची गर्दी होणे व प्राथामिकापेक्षा दुय्यम प्रतीचंच शिक्षण जास्त फैलावतें ही तक्रार दूर होणे दुर्घट दिसते. सन १८९१ ते १९११ पर्यंत दुय्यम शिक्षणाच्या शाळांतील विद्यार्थी दुपटीहून वाढले, पण प्राथमिक शाळांतील काय ते शेकडा ६७ नीच वाढले. मिशनन्यांच्या गांवोगांव फुकट शाळा व त्यांमधील परोपरीची आकर्षकं असूनही त्यांनी हाती धरलेल्या निकृष्ट वर्गात शिक्षणाचा प्रसार होत नाही ह्याचे वर्म तरी हेच आहे. लिहिण्यावाचण्याला 'तिसरा डोळा' म्हणतात. दोन जाऊन जर तिसरा येत असला तर तो हवा असे कोणीही म्हणणार नाही. पोटाची दोन कामे येऊन जर साक्षरतेचा लाभ झाला तर खरें कल्याण आहे. तेव्हां प्राथमिक शाळेचा तरी अभ्यासक्रम व वेळ असा ठेविला पाहिजे की, विद्यार्थ्यांना लिहिणे शिकून आपला पिढीजाद किंवा दुसरा धंदा हस्तगत करण्याला सवड सांपडेल. ओबडधोबड आऊत. काठी तयार किंवा दुरुस्त करण्यासाठी कुणब्याला आपल्या उत्पन्नाच्या चौथ्या वांट्यावर बलुते द्यावे लागते. ह्यास्तव प्राथमिक शाळांतून जर सुतारकी, लोहारकी, चांभारकी वगैरे विषयांचे शिक्षण देण्याची सोय झाली तर शाळेंत मुले घातल्यापासून फायदा आहे असे लोकांच्या अनुभवाला फार थोड्या अवधींत येईल. शाळेंत धंदेशिक्षण घेऊन जे कुणबी बाहेर पडतील ते आपली बलुत-कामें घरच्या घरी करतील. अशा रीतीने त्यांची कामें वेळच्या वेळी होऊन त्यांसाठी खर्च होणारा पैसा व वेळ वांचला तर इतरांनाही आपली मुळे शाळेत घालण्याची उभेद येईल. मि. कीटिंग साहेबांच्या अंदाजाप्रमाणे दक्षिणेतील शेतकऱ्यांना शेतकाम फार तर सहा महिने पुरते. तर मग शेतकाम संभाळून त्यांना कारू-नारूंचे काम करण्याला पुष्कळ फुरसत आहे. तिच्यांत त्यांनी काहीं आऊने केली तर ती त्यांना विकताही येतील, आणि आपल्या उत्पन्नांत भर टाकता येईल. सध्यां जातिधर्माप्रमाणे कुणबिकीच्या आउतांपैकी एक एक जातीचा कारू करतो, दुसरें दुसरीचा, एवढेच नव्हे तर सनगाचे वेगवेगळाले भाग वेग