पान:गाथा पंचक-गाथा पहिली-श्री ज्ञानदेव महाराज यांच्या अभंगाची गाथा.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) आदिनाथ उमा बीज प्रगटलें । मच्छिंद्रा लाधलें सहजस्थिती १ तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गयनीनाथा २ वैराग्यें तापला सप्रेमें निवाला । ठेवा जो लाधला शांतिसुख ३ निर्द्वद्व निःसंग विचरतां मही । सुखानंद हृदयीं स्थिर जाला ४ विरक्तीचें पात्र अन्वयाचें मुख ! देउनि सम्यक् अनन्यता ५ निवृत्ती गयनी कृपा केली पूर्ण । कूळ हें पावन कृष्णनामें ६ हें पाहून ज्ञानेश्वर सोपान व मुक्ताबाई या त्रिवर्गीनीं निवृत्ति- महाराजांचे पाय धरिले, त्यावरून श्रीनिवृत्तिनाथांनी श्री ज्ञानदेव- महाराजांवर अनुग्रह केला. त्याबद्दल श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी खालील अभंगांत आपल्या गुरुपरंपरेचा उल्लेख केला आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा । मच्छिद्र तयाचा मुख्य शिष्य ? . मच्छिद्रानें बोध गोरक्षासी केला । गोरक्ष ओळला गयनीप्रती २ गयनीप्रसादें निवृत्ती दातार । ज्ञानदेवा सार चोजविलें ३ यापुढे निवृत्तिनाथाचें बंधूचें नातें सुटून गुरुशिष्याचे नातें झालें. पुढें श्रीज्ञानदेवमहाराजांनीं श्रीसोपानदेव व श्रीमुक्ताबाई यांज- वर अनुग्रह केला. नंतर ते नाशिक, पुणतांबें या गांवांवरून पैठणास येऊन मुख्य धर्माधिकारी व शिष्टजन यांची गांठ घेऊन सभा करून आम्हांस शुद्ध करावे म्हणून श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी त्यांची प्रार्थना केली. पैठणकरांनी परमेश्वराची अनन्यभावानें भक्ति करून सर्व भूतांच्या ठायीं समानता ठेवून तीव्र अनुताप पोटीं धरून भगवद्भजन करा, ह्या- प्रमाणे वर्तन केल्याने तुम्ही शुद्ध व्हाल. असे सांगून शुद्धिपत्र दिलें. पैठणाहून शुद्धिपत्र मिळवून ते नेवाशास आले. येथेंच श्रीज्ञानेश्वर- महाराजांनीं भगवद्गीतेवर भावार्थदीपिका अथवा आई ज्ञानेश्वरी या नांवाची टीका केली. ती सच्चिदानंदबावांनी लिहिली. श्रीज्ञानेश्वरम हाराजांनी ती टीका श्रीगुरु निवृत्तिनाथापुढे ठेविली. ती पहातांच त्यांस फार कौतुक वाटलें व त्यांनीं श्रीज्ञानेश्वरमहाराजांची धन्यता