पान:गाव झिजत आहे.pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. गरीब शेतकरी कसाही असला तरी त्याचे शेतीतील उत्पादन हे मोठ्याशेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादनापेक्षा दर हेक्टरी सरासरीने जास्त आहे. कारण छोटीशेती असल्यामुळे शेतीवर त्याला लक्ष द्यावे लागते. अशा कोरडवाहू अल्पभूधारकशेतकऱ्यांच्या विकासासाठी काही गोष्टी निश्चितपणे करता येतील.त्याची चर्चा झालीपाहिजे.  मराठवाड्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत साखर कारखाने आहेत. हे कारखानेवर्षभर चालू नसतात. ऑक्टोबर ते एप्रिल-मे असे त्यांचा हंगाम असतो. याच काळातकोरडवाहू शेतकऱ्यांनाही शेतीत काहीच काम नसते. तेव्हा अशा छोट्या शेतकऱ्यांनासाखर कारखान्यात हंगामी अग्रहक्काने काम दिले पाहिजे. त्यांच्यासाठी पूरक उत्पन्नाचेहे हक्काचे साधन व्हावे. अर्थात जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना हे काम पुरणार नाहीम्हणून इतर क्षेत्रेही धुंडाळावी लागतील.  कापूस उत्पादनात विदर्भानंतर मराठवाड्याचा क्रमांक लागतो. मराठवाड्याच्यासर्वच जिल्ह्यांत भरपूर कापूस होत नसला तरी काही जिल्हे वगळता कापसावर प्रक्रियाकरण्याचा उद्योग सुरू करता येईल. अनेक ठिकाणी जिनिंग, प्रेसिंग, आणि सूतगिरण्यानिघाल्या आहेत. परंतु कापसावर संपूर्णपणे प्रक्रिया व्हावी म्हणून सूतगिरणी बरोबरचकापडगिरण्या आणि त्यांची विक्री केंद्रेही काढली पाहिजेत. आज तुटकतुटक हे कामसुरू आहे. जार जिनिंग ते कापड गिरणी अशा सर्वच प्रक्रिया एकाच भूक्षेत्रावर केल्या तरअशा प्रत्येक युनिटमागे हजारो शेतकऱ्यांना पाच-सहा महिने काम मिळू शकते. आज सहकारी पद्धतीने चालणाऱ्या ज्या जिनिंग, प्रेसिंग बंद आहेत त्यांची कारणे शोधूनकापसाच्या प्रक्रिया उद्योगातील विविध घटक एकाच भूप्रदेशावर सुरू करावेत. म्हणजेसाखर कारखान्याप्रमाणेच अनेकांना हंगामी काम देता येईल.मराठवाड्यात तेलबियांचे बऱ्यापैकी उत्पादन आहे. कापसातून निघणारीसरकी, भुईमुग, करडई, जवस, मोहरी, सूर्यफुल, सोयाबिन यांच्यावर तेलासाठीप्रक्रिया करणारे कारखाने सुरू होऊ शकतात. भारत देश दरवर्षी लाखो टन खाद्यतेलांचीआयात करीत आहे. २००४-०५ मध्ये ५२.९० लाख टन खाद्यतेलाची आयात झालीहे सर्वांन माहीत आहे. तेलबियांवर प्रक्रिया उद्योगाचा व्यवस्थित विचार केला तर याउद्योग क्षेत्रातही हजारो कोरडवाहू शेतकऱ्यांना हंगामी रोजगार उपलब्ध करून देतायेईल. अशा हंगामी प्रक्रिया उद्योगांत हजारो कोरडवाहू शेतकऱ्यांना सामावून घेतले तर त्यांच्यासाठी हे अतिरिक्त उत्पन्नाचे साधन ठरेल. ९६ / गाव झिजत आहे