पान:गाव झिजत आहे.pdf/१०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

, उसनवारीसारखे असावे. हा व्यवहार करण्यासाठी बँकांनी शेतकन्यांकडून ५०-१०० रुव्यस्थापन खर्च घेण्यास हरकत नाही. दरवर्षीच्या शेती हंगामासाठी ही प्रथा सुरू झालीतर छोट्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येणार नाही.  एस्.ए.झेड च्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावात ग्राम पंचायत आणि विकासाचीजाणीव असलेल्यांची समिती नेमावी व त्या समितीद्वारे शेती, पीकपाणी, शेतीउत्पादनावर प्रक्रिया उग, इत्यादींचे गावकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. प्रत्येक गावातधान्याचे गोडाऊन बांधावे. सेवा सहकारी सोसायटीने माल सांभाळण्याचा खर्चशेतकऱ्यांकडून घ्यावा. या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक गरज तात्पुरती भागेल. शेतकऱ्यावर गरजेपोटी पडेल भावात माल विकण्याची पाळी येणार नाही. चांगला भावआल्यावरच तो आपले उत्पादन विकेल. गावात होणाऱ्या कृषी उत्पादनावरील काहीधान्यावर प्रक्रिया करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. गावातच तेल, पेंड, डाळीतयार करून मगच ती बाजारात जाईल अशी व्यवस्था करावी. शासनाने अशा वस्तू हमीभावाने खरेदीची व्यवस्था केली तर अधिक सोपे होईल.दुष्काळी भागातील दुभत्या जनावरांची वाढ करण्यासाठी विशेष योजनाआखावी. गावातील दूध डेअरीच्या वने दुधावर प्रक्रिया करून दही, ताक, लोणी,तूप तयार करण्याची यंत्रसामुग्री आणि त्या संबंधीचे सर्व प्रशिक्षण संबंधितांना द्यावे.प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या मालासाठी शासनाने बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी.पहिली पाच वर्षे एस्.ए.झेड च्या गावात निर्माण होणाऱ्या सर्वच वस्तूवर शासनानेसबसिडी द्यावी. दुष्काळी भागात आरोग्याचे प्रश्नही फारच गंभीर आहेत. मुलीच्या लग्नाचे वय १८ पर्यंत पोहचलेले नाही. प्राथमिक आरोग्य केन्द्र नावालाच उभे आहेत. तेथे २४ ताससोडा काही तासही आरोग्य कर्मचारी उपस्थित नसतात. एस्.ए.झेड साठी निवडलेल्याक्षेत्रात सर्वांना आरोग्याच्या सेवा मिळतील याची हमी देण्यात यावी. त्यासाठी स्वतंत्रग्रामीण रुग्णालय उभे करावे आणि सतत आरोग्य सेवा उपलब्ध ठेवावी. फिरत्यारुग्णवाहिकेची सोय असावी. एस्.ए.झेड सुरू झाल्यापासून पहिल्या पाच वर्षांत १८वर्षानंतर मुलीचे व २१ वर्षानंतर मुलाचे लग्न करणाऱ्या कुटुंबाला भरघोस आर्थिक मदतजाहीर करावी. माता. बालसंगोपनाचा कार्यक्रम प्रयत्नपूर्वक राबवावा. ग्रामीणस्वच्छता वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. एस्.ए.झेड क्षेत्रात येणाऱ्यागावासाठी आरोग्याचे विशेष कार्यक्रम राबवावेत. ९८/ गाव झिजत आहे