पान:गाव झिजत आहे.pdf/११०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षणासाठीची पायाभूत व्यवस्था प्रत्येक गावात करावी. शाळेची इमारतआणि शाळेचे प्रांगण सुंदर असावेच पण त्याचबरोबर त्या शळेत शिकवणाऱ्याशिक्षकांना व इतर कर्मचाऱ्यांना गावातच राहणे बंधनकारक करावे. एस्.ए.झेडक्षेत्रातील गावासाठी यांत्रिक आणि तांत्रिक शिक्षण देणारी महाविद्यालये उभी करावीतआणि तेथे सवलतीच्या दराने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जावे. १२वी ला चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षणाची सर्व सोय शासनाने करावी.त्यासाठी होणारा खर्च त्याला नोकरी देऊन त्याच्याकडून हवा तर वसूल करण्यास हरकतनसावी. एस्.ए.झेड मध्ये येणाऱ्या सर्व गावांतून कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरेबांधावीत आणि तेथे राहणान्यांसाठी पाणी, लाईट, रस्ते इत्याची सोय करावी. याघरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ग्रामपंचायतीने भाडे वसूल करावे. म्हणजेग्रामपंचायतचे उत्पन्नही वाढेल. एस्.ए.झेड च्या गावात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना हवा तरवेगळा भत्ता देण्यात यावा,  अशा अनेक योजना एस्.ए.झेड मध्ये आखाव्यात आणि त्यासाठी पहिली पाचते सात वर्षे त्या भागातील खेड्यांना भरपूर आर्थिक सहकार्य करावे, विविध सवलतीद्याव्यात. असे झाले तर पंधरा-वीस हजार हेक्टरचा दुष्काळी भाग उत्तम प्रकारेविकसित होईल. शेती, शिक्षण आणि आरोग्य या विकासाच्या पायाभूत गरजा आहेतअसे मानले जाते. एस्.ई.झेड साठी शासन भरपूर सवलती देऊ शकते तर एस्.ए.झेडसाठी का देऊ शकत नाही 'मेगा वॉटरशेड' मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे. त्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात स्पेशल अॅग्रीकल्चरल झोन निवडावा. आणि तेथेविकासाच्या बहुविध योजना विशेषत्वाने राबवाव्यात. असा प्रयोग करण्याचे धाडसशासनाने दाखवावे. यातून निश्चितच दुष्काळी भागाचा विकास साधेल असे मलावाटते. उद्योग धंद्याचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास ही कल्पना अपूरी आहे. ग्रामीणभागातील शेतीचा विकास उद्योग समजून करणे गरजेचे आहे. त्यासाठी एस्.ई.झेडप्रमाणेच सवलती दिल्या गेल्या पाहिजेत. शेतीत सुधारणा झाली. वरील उपाययोजनाअमलात आणल्या तर गावकऱ्यांना बाराही महिने रोजगार उपलब्ध होईल. गावांतीलपाच दहा कुटुंबाऐवजी हजारो कुटुंबांत संपन्नता निर्माण होईल. अशी विकेंद्रित अर्थ व्यवस्था लोकशाहीला बळकट करू शकेल. एस्.ई.झेड मुळे नवा वसाहतवाद पुन्हाभारतात जन्म घेतो की काय अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी 'साझ' हवा / ९९