या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मचाऱ्यांना दर महिन्याला रुपये २१,०८,४११/- इतका त्यांचा एका गावासाठी पगार होतो. जर हे कर्मचारी गावातच राहिले असते तर दर महिन्याला पगाराच्या रूपाने रुपये १,०८,४११/- इतका पैसा एका गावात आला असता. त्यांचा पगारही गावातच खर्च झाला असता. त्यामुळे घरमालक, गांवाकडील दुकानदार, भाजीपाला विकणारे टपरीवाले, धोबी, न्हावी इ.इ.च्या उत्पन्नात भर पडली असती. परंतु हे कर्मचारी शहरात राहत असल्यामुळे त्यांचा खर्चही हरातच होतो. त्यामुळे शहराचे उत्पन्न वाढते.शहराच्या आर्थिक उत्पन्नात भर पडते.  दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व कर्मचारी गावातच राहिले तर गांवातीलसर्वांशीच त्यांचा संपर्क वाढेल. शेतकऱ्यांना गांवातच त्यांच्या मालकीचे सात-बाराचे उतारे मिळू शकतील. चौकशी केली तेव्हा असे लक्षात आले की, सात-बाराचा उतारा मिळविण्यासाठी शेतकऱ्याला तलाठ्याकडे दोन-तीन फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे तेवढे दिवस शेतकऱ्यांचे वाया जातात. त्यांची मजुरी बुडते. तलाठ्याकडे जाण्यायेण्याचा खर्च होतो तो वेगळा! गावात शिक्षक राहिले तर त्यांची मुलेही त्याच शाळेत शिकतील. शिक्षक नियमितपणे वेळेवर शाळेत उपस्थित राहतील आणि शिकनतीलही. इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही असेच घडेल. यामुळे गावात निर्माण होणाऱ्या अडचणी त्वरित सोडवल्या जातील. विकासाच्या सर्वच योजना गावात मार्गी लागतील. पगाराच्या रूपाने गावात तर पैसा येईलच. शिवाय कर्मचाऱ्यांच्या शोधासाठी जाणारा शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल. तो गावातच राहील. दर महिन्याला गावाचे हजारो रुपये वाचतील.म्हणून गावासाठी नेमलेला कर्मचारी गावातच राहिला पाहिजे, असे आग्रहपूर्वक मोरफळीच्या ग्रामसभेत मी सांगितले आणि लोकांनीही टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. साचा:GAPसाचा:GAPमानवलोकने केलेल्या सर्वेक्षणात गावात न राहण्याबद्दल कर्मचाऱ्यांनी एक अडचण सांगितली. ती म्हणजे त्यांना राहायला भाड्यानेदेखील चांगली घरे मिळतनाहीत ही त्यांची अडचण आम्हाला रास्त वाटते. ही अडचण दूर झाली तर अधिक कर्मचारी निश्चित गावात राहतील असे काही शिक्षकांनी सांगितले होते. पण विपन्नावस्था झाल्यामुळे चांगली घरे बांधून ती कर्मचाऱ्याला भाड्याने देण्याची ऐपत फारशी कोणाजवळ नाही. यासाठी दुसरी उपाययोजना करावी लागेल. गेल्या काही वर्षांपासून शासनाने लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार-खासदार यांच्या मतदारसंघात विकासकामासाठी काही निधी राखून ठेवला आहे. या निधीतूनचगावातला नोकरसाचा:PARAGRAPH गावात/३