या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०. ग्रामराज्य लोकशाहीचा आधार

ब्रिटिशांनी या देशाचे सर्वांत मोठे नुकसान जर कोणते केले असेल तर तेभरभक्कम पायावर उभी असलेली ग्रामरचना मोडीत काढली. दोनशे वर्षांपूर्वी प्रत्येकगाव हे स्वावलंबी होते. एवढेच नव्हे तर ते एक छोटे राज्यच होते. गावांची परंपरा,गावांचे सण, वागण्याचे नियम, चालीरीती, न्यायपद्धती ठरविण्याची प्रत्येक गावालामुभा होती. जशा आदिवासी आणि मागासलेल्या वर्गांत जातपंचायती आहेत आणि त्या पंचायतीच्या धारणेप्रमाणेच तो समाज आजही वागतो आहे, असे काहीसे स्वरूपगावाचे होते. फरक एवढाच की गावामध्ये अनेक जाती-जमातींचे लोक राहत होते. यासर्वांना एकत्र घेऊन जाणारी त्या गावची पद्धत होती. थोडक्यात सर्वांना लागू पडणारेगावांचे नियम होते. हे नियम तोडणारांना शिक्षा करणारी पंचायत होती. त्यामुळे गावांतील भांडणे, तंटे, शेतीची प्रकरणे, नैतिक-अनैतिक गणुकीवरची बंधने यापंचायतीच्या मार्गदर्शनाखालीच चालत होती. आर्थिक दृष्ट्याही गाव स्वावलंबी होते.स्वावलंबी गाव हेच या देशाचे वैशिष्ट्य होते. अनेक राजे आले आणि गेले. अनेकसम्राट आपली कारकीर्द गाजवून गेले, पण त्यांपैकी कोणालाही ही ग्रामव्यवस्था तोडताआली नाही. किंबहुना ते तोडू शकले नाहीत. त्यामुळे ग्रामराज्याचा राजेरजवाड्यांवरहीवचक होता. ग्रामरचना आणि व्यवस्था तोडल्याशिवाय या देशात पाय रोवणे कठीण आहे.याची चहाच्या व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या चाणाक्ष इंग्रजांना जाणीव झाली होती.आपले राज्य अबाधित ठेवण्यासाठी म्हणून, त्यांनी ग्रामरचना विस्कळीत करण्याचे घोरपाप केले. याची जाणीव महात्मा गांधींना होती म्हणूनच ते ग्रामस्वराज्याच्या रूपानेग्रामराज्य लोकशाहीचा आधार / ३९