या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११. परस्परावलंबी गाव-स्वावलंबी गाव

विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतातील गावाची संस्कृती वेगळी होती.औद्योगिक क्रांतीनंतर विविध जीवनोपयोगी वस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणात यंत्राव्दारेकारखान्यात होऊ लागली आणि त्याचा परिणाम प्रथम शहरात जाणवला. कारखान्यातहोणाऱ्या दैनंदिन गरजा भागविणाऱ्या वस्तू हळूहळू ग्रामीण भागातही पोहचल्या. याचेबरेवाईट परिणाम ग्रामीण भागावर झाले आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये आहिस्ते कदम बदल होऊ लागला. शहरी संस्कृतीची छाप ग्रामीण भागावर जाणवू लागली. १९ व्याशतकाच्या पूर्वार्धापर्यंत ग्रामीण जीवन वेगळे होते. प्रत्येक गाव स्वतंत्र तर होतेच.एकसंध होते. क्वचितच एका गावाचा संबंध दुसऱ्या गावाशी असायचा. तोहीपाहुण्यापुरता मर्यादित. प्रत्येक गाव, गावातील कारागीर, शेतकरी, मजूर यांचे जीवनआणि सौख्य शेतीत निर्माण होणाऱ्या अन्नधान्यावर आणि गावात निर्माण होणाऱ्यावस्तूंवर अवलंबून होते.  शेतीचा शोध लागल्यानंतर शेती उत्पादनासाठी लागणारी अवजारे हळूहळूविकसित झाली. औत, नांगर, कोळपे, तिफन, मोगडा, खोरे, इ. इ. चा शोधशेतीविकासाच्या गरजेतूनच लागला. ही सर्व सामुग्री गावातच लाकडापासून तयार होतहोती. पण पुढे औद्योगिक क्रांतीमुळे या सर्व वस्तू रेडीमेड फॉर्म मध्ये गावामध्येपोहचल्या. १९ व्या शतकाच्या अंतापर्यंतचा काळ ग्रामीण भागासाठी वगळाच गाव शेतीउत्पन्नावर जगत होते. शेतकऱ्यांनी शेत पिकवायचे, कारागिरांनी. शेतीकसण्यासाठी लागणारी अवजारे तयार करून पुरवायची. शेती नसणाऱ्यांनी शेतीत कामकरायचे गावकारागिरांनी शेतीसाठी लागणारी केवळ अवजारेच पुरवायची नाहीत, तरगावकऱ्यांना लागणाऱ्या वस्तूं निर्मितीही करायची. म्हणजे असे की, सुताराचा परस्परावलंबी गाव-स्वावलंबी गाव / ४३ ठळक मजकूर