या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

.

१४. बोअरचे पाणी पिण्यासाठी

-पावसाचे पाणी शेतीसाठी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या दरवर्षीच गंभीर स्वरूप धारण करीतआहे. याची सर्वात जास्त झळ गरीब कुटुंबांनाच सोसावी लागते. पाणी ही राष्ट्रीय संपत्तीआहे. सर्वांचा तिच्यावर हक्क आहे. सर्वांचा त्याच्यावर हक्क आहे असे आजपर्यंत कोणीमानतच नव्हते, कारण पाणी मुबलक होते.भारतात जगाच्या एकूण पाण्याच्या उपलब्धीपैकी ४.९ टक्के पाणी आहे. पूर्वीहीपाणी तेवढेच होते आणि आजही तेवढेच आहे. तरीही पिण्याच्या पाण्याची समस्याग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावत असते. याचे कारण वाढती लोकसंख्या!१९७५ पर्यंत जेवढी धरणे भारतात बांधली गेली त्यांपैकी निम्मी धरणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात धरणाच्या पाण्याचा प्रामुख्याने सिंचनासाठी आणि काही ठिकाणीवीजनिर्मितीसाठी उपयोग केला गेला. धरणाचे पाणी पिण्यासाठी सुध्दा वापरावे लागेलअसे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. पण अलीकडच्या काळात धरणातील पाणीशहरवस्तीला त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पुरविण्यात येत आहे.ग्रामवासीयांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून खेड्यांत लाखो बोअर्सघेण्यात आले. अनेक गावांना काही काळ बोअर्सचे पाणी मिळालेदेखील. पणबोअर्सही कोरडे पडू लागले. म्हणून अलीकडच्या काळात टँकरद्वारे ग्रामीण भागालापाणीपुरवठा होऊ लागला. पण पाणी कमी का पडते? विहिरी कोरड्या का पडतात?बोअर्सचे पाणी का संपते? याचा मात्र गंभीरपणे विचार अजूनही झालेला दिसत नाही. बोअरचे पाणी पिण्यासाठी-पावसाचे पाणी शेतीसाठी/ ५७