या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझ्या {{<cen{terमनोगत|>}} {rightगाव झिजत आहे' या मथळ्याखाली दैनिक सुराज्य, बीड आणि दैनिक लोकमत या वृत्तपत्रात लिहिलेल्या वीस लेखांचा हा संग्रह आहे.|}}}}}

साचा:मी खेड्यात जन्मलो आणि आजही खेड्यांच्या संपर्कात आहे.}}} लहानपणी बघितलेलं खेडं आणि आजच खेडं, लहानपणी बघितलेली अंबाजोगाई, परळी आणि लातूर ही शहरं आणि आजचा त्यांचा विस्तार या सगळ्यांचा विचार करताना शहरांची वाढ ही खेड्याच्या श्रमावर झाल्याचं जाणवतं. यासंबंधी गावात राहणाऱ्या जाणकारांशी मी बोलत आलो. मानवलोकच्या कृषक पंचायत या संघटनेतील छोट्या शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यातूनच गावासंबंधी जे जाणवलं ते लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. शाळा-कॉलेजमध्ये असतानाच राष्ट्र सेवा दल शिबिरात सहभागी होण्याचा योग आला होता. या शिबिरात म. गांधी आणि त्यांच्या विचारांची ओळख आचार्य शंकरराव जावडेकर, आचार्य शं. ज. भागवत आदींनी करून दिली होती. म. गांधींचे सुराज्य हे पुस्तक वाचण्यात आलं होतं. विनोबांनी लिहिलेलं ग्रामस्वराज्यावरच पुस्तकही वाचलं. त्या पुस्तकातील विचारासंबंधीची {{right<श्री. वसंत पळशीकर यांनी केलेली चिकित्साही वाचण्यात आली. |}}}}}center|<poem><. हे वाचन गाव झिजत आहे या माझ्या लेखमालेसाठी उपयोगी पडले आणि त्यातूनच हे पुस्तक लिहिले गेले.

मी तत्त्वचिंतक नाही किंवा लेखकही नाही. त्यामुळे हे पुस्तक

}}}center|<poem>

ग्रामविकासावरील चिंतन आहे असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. यात लिहिलेले काही मुद्दे आज जरी काहींना क्षुल्लक किंवा चुकीचे वाटले तरी, बदलत्या परिस्थितीत त्यांचा विचारच नव्हे तर आचार करणेही गरजेचे ठरणार आहे. ग्रामीण वसाहत ही [[[:साचा:Gapआठ / गाव झिजत आहे]]}}}