या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरुवातीपासूनच शेतीतील उत्पादन घटण्यास सुरुवात झाली आहे. हरितक्रांती,धवलक्रांती झाली आणि संपलीही. शेतकरी मात्र कर्जातून मुक्त नाही.  शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर छोट्या कोरडवाहू शेतकऱ्यांच्याउत्पादनाला योग्य भाव दिला गेला पाहिजे. एवढ्यावरच थांबून चालणार नाही. सध्यादेशातील एकूण जमिनीपैकी केवळ ४९ टक्के जमीनच अन्नधान्य उत्पादन करू शकते.५१ टक्के जमीन ओसाड आणि बिगर उत्पादित आहे. उत्पादित जमिनीवर फळबागाफुलविण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. यामुळे फळांच्या बाबतीत देश स्वावलंबीझाला पण अन्नधान्याचे उत्पादन मात्र घटत आहे. ओसाड आणि पडीक जमिनीचा परफळझाडांच्या लागवडीसाठी केला आणि मूळ एकूण ४९ टक्के जमिनीवर शेती उत्पादन वाढविले तर हा प्रश्न सुटू शकेल असे वाटते. नवनव्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यामागेही काही कारणे आहेत. रशिया आणिअमेरिकेच्या मोनोक्रॉपींग उत्पादन पद्धतीची आपण नक्कल केली. एकच एक प्रकारचेपीक शेतात घेतले जाऊ लागले. त्यामुळेही असे घडले असेल असे जाणकारांना वाटते.पूर्वीच्या आपल्या शेतीमध्ये शेतकरी 'इरवाड' पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर करीतहोता. त्यामुळे एका शेतावर एकाच वेळी विविध प्रकारची पिके कमी जास्त प्रमाणातघेतली जात होती. रोगराईचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी त्याचा उपयोग होत असे. हीपद्धत पुन्हा आणली गेली पाहिजे. गव्हामध्ये मोहरी, गाजराचे पीक, करडईचे पट्टे पेरलेजायचे. काही तज्ज्ञांचे मत असे आहे की, यामुळे पिकावर येणाऱ्या रोगांना प्रतिकारहोत असे. ही पद्धत पुन्हा सुरू झाली पाहिजे. याचा दुसरा परिणाम असा की एकच एकपीक पेरल्यामुळे मोसम चांगला नसेल तर पीक उत्पादन घटते. शेतकरी तोट्यात योतो. त्याच्या हाती काहीच लागत नाही. इरवाड पद्धतीमुळे एक पीक गेले तरी दुसरे पीक हाती

लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तोट्याचे प्रमाण घटते.

भारतातील शेतीचा कणा अल्पभूधारक शेतकरी आणि छोटे कोरडवाहूशेतकऱ्यांनीच मजबूत ठेवला आहे मात्र अमेरिका, रशियाच्या शेतीपद्धतीने भाळलेलेतज्ज्ञ छोटी शेती परवडत नाही असा आक्रोश करीत आहेत. छोट्या शेतकऱ्यांची शेतीएकत्र करावी आणि कॉर्पोरेट पद्धतीने तिचा वापर करावा असाही प्रचार मोठ्या प्रमाणातहोत आहे. यामुळे काही काळ छोटा शेतकरी सुखात राहील. पण लांब पल्ल्याचा विचारकेला तर तो आपले स्वामित्व आणि स्वाभिमान गमावून बसेल. भारतीय शेतीतीलछोट्या शेतकऱ्यांचे बळ संपले तर पुन्हा नवीन जहागीरदार, सरंजामदार आणि

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी/६५