या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुन्हा पाश्चात्यांचेच अनुकरण देशात सुरू आहे. त्यांच्यासाठी वृद्धाश्रम सुरू केलेआहेत. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. भारतीय संस्कृतीचा वारसा जपणाऱ्यांनी याचाविचार जरूर करायला हवा. वृद्धाश्रमाची संकल्पना भारतीय संस्कृतीत बसणारी नाही.पण प्रतिष्ठेच्या खुळ्या कल्पना गांवातही पोहचल्या आहेत. त्यामुळेच एकत्रकुटुंबपद्धतीचा हास सुरू आहे.ग्रामीण भागात लोकसंख्येच्या दहा टक्के एवढी वृद्धांची संख्या आहे. वृद्धमाणसात आणि लहान मुलामध्ये बरेच साम्य असते. लहान बालकाची काळजी घ्यावी लागते. कारण त्याला स्वत:ला काहीच करता येत नाही. वृद्धांचीही अवस्था अशीचअसते. अतिवृद्धांची तर लहान मुलांप्रमाणेच काळजी घ्यावी लागते. फरक एवढाच कीलहान मुलाच्या संवेदना हळूहळू विकसित होत असतात. कोणी थोडेसे दुर्लक्ष केले तरीते विसरून जाते. पण वृद्धांच्या संवेदना जागृत असतात. त्यांच्या असहायतेचा कोणीगैरफायदा घेतला, त्यांच्याकडे कोणी दुर्लक्ष केले तर त्यांना खूप दुःख होते. वेदनाहोतात. समाधानाने जगण्याचे सुख त्यांना मिळू शकणार नाही या जाणीवेने ते निराश होतात. आपण कुटुंबावर भार तर नाही ना अशी रुखरुख त्यांना सतत बोचत राहते.त्यांना वृद्धाश्रमात ठेवून कुटुंबातील आनंद व समाधान त्यांना कोणीही देऊ शकत नाही.पण दुर्दैवाने वृद्धाश्रम हाच यावर उपाय समजून अनेक कर्ती-धर्ती मुले आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखविण्यात इतिकर्तव्यता समजतात. वृद्धाश्रमाची हीसंस्कृती ग्रामीण भागातील कुटुंबव्यवस्था ढासळून टाकीत आहे. फ्लॅट संस्कृतीचाशिरकाव आता खेड्यात झाला आहे. एकत्र कुटुंबपद्धती ही वृद्धांना सुखी ठेवणारी ,त्यांना आधार देणारी होती. या पद्धतीला वृद्धाश्रम पर्याय होऊ शकत नाही.दारिद्रयामुळे म्हाताऱ्या आई-वडीलांना सांभाळणे कठीण आहे. त्यामुळेआमच्या संसारावर आर्थिक बोजा पडतो असे अनेक जण सांगतात. पण हे तेवढेसे खरेनाही. कारण वृद्धांना आर्थिक मदत देणाऱ्या अनेक योजना शासनाकडे आहेत.स्वयंसेवी संस्था वृद्धांसाठी काही सुखसोयी निर्माण करून देत आहेत. प्रश्न आहे वृद्धांना माणूस म्हणून जपण्याचा. त्यांच्यासाठी वेळ देण्याचा. ही संवेदनशीलता पूर्वीघराघरातून पाहायला मिळत होती ती तशीच कायम कशी राहील यासाठी नियोजनबद्धप्रयत्न करण्याची गरज आहे. ही संवेदनशील मानसिकता घडविण्याचे काम शालेयजीवनापासूनच सुरू झाले पाहिजे. वृद्धांना जगण्याचा हक्क आहे आणि हा हक्क शाबूतठेवण्याचे कर्तव्य कुटुंबातील कमावत्या व्यक्तीने पार पाडले पाहिजे. समाजातील एकत्र कुटुंब-सुखी कुटुंब /७५