पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/100

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४-भागवतधर्माचा उदय घ गीता ५३७ आणि उलटपक्षीं ज्ञानोत्तरहि कर्म सोडितांयेत नाहीं, वैराग्यानें बुद्धि निष्काम करून जगांत व्यवहारसिद्धयर्थ ज्ञानी पुरुषानें हीं सर्व कर्मे केली पाहिजेत, असें ईशावास्यादि दुसरी उपनिषदें प्रतिपादन करूं लागली या उपनिषदांवरील भाष्यांतून हा भद काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण शांकरभाष्यांतील हे सांप्रंदायिक अर्थ ओढाताणीचे असून या उपनिषदांचा स्वतंत्रपणें विचार करीत असतां ते ग्राह्य मानितां येत नाहीत, असें गीतारहस्याच्या अकराव्या प्रकरणाच्या अखेर केलेल्या विवेचनावरून दिसून येईल. यज्ञयागादि कर्म व ब्रह्मज्ञान यांचाच केवळ याप्रमाणें मेळ घालण्याचा प्रयत्न झाला असें नाहीं; तर कापिलसांख्यांतीलप्रथम स्वतंत्ररीत्या उद्भवलेलें क्षराक्षरज्ञान आणि उपनिषदांतील ब्रह्मज्ञान यांचीहि शक्य तेवढी एकवाक्यता करण्यास याच काली सुरुवात झालेली होती, असें मैत्र्युपनिषतांतील विवेचनांवरून उघड होतें. बृहदारण्यकादि जुन्या उपनिषदांत कापिलसांख्य ज्ञानाला महत्त्व दिलेले नाही. पण मैत्र्युपनिषदांत सांख्यांची परिभाषा पूर्णपणे स्वीकारून एका परब्रह्मापासून अखेर सांख्यांची चोवीस तत्त्वें निर्माण झाली असें वर्णन आहे. तथापि कापिलसॉख्यशास्रहि वैराग्यपरच म्हणजे कर्माला विरुद्ध आहे. म्हणून एकंदरीत पहातां (१) केवळ यज्ञयागादि कर्म करण्याचा मार्ग (२) ज्ञानार्ने व वैराग्यानें कर्मसंन्यास करणे म्ह० ज्ञाननिष्ठा अगर सांख्यमार्ग, आणि (३) ज्ञानानें व वैराग्यदुद्धीनेंच सदैव कर्मे करण्याचा म्हणजे ज्ञानसमुच्चयमार्ग, असे तीन पक्ष वैदिक धर्मत प्राचीन काळीच उद्भवले होते असें दिसून येतें. यांपैकीं ज्ञानमार्गातूनच योग व भाक्ति या दुसच्या दोन शाखा पुढे निर्माण झाल्या आहेत.परब्रह्माचे ज्ञान होण्यास ब्रह्मचिंतन करणें अवश्य आहे; आणि हें चिंतन, मनन किंवा ध्यान करण्यास चित्त एकाग्र करावें लागत असून, ह्यासाठीं परब्रह्माचे कोणतें तरी सगुण प्रतीक प्रथम डोळ्यांपुढेठेवावें, असें छांदेोग्यादि जुन्या उपनिषदांतून सांगितले आहे. अशा प्रकार ब्रह्वोपासना करीत असतां जें चितैकाग्रय होतें त्यासच पुढे विशेष महत्त्व दिल्यामुळे चित्तनिरोधरूपी योग हा निराळा मार्ग झाला; आणि सगुण प्रतीकाऐवजीं परमेश्वराचें व्यक्त मानवरूपधारी प्रतीक उपासनेस घेण्यास हळूहळू सुरुवात होऊन अखेर भाक्तेमार्गे निघालेला आहे. भक्तिमार्ग किंवा भक्तीची कल्पना औपनिषदिक ज्ञानास सोडून मध्यंच स्वतंत्ररीत्या उद्भवलेली नाहीं किंवा दुसच्या देशांतूनहि हिंदुस्थानांत आलेली नाहीं. ब्रह्मचिंतनार्थ प्रथम यज्ञांतील अंगांची किंवा ॐकाराची, आणि पुढं रुद्र, विष्णु, इत्यादि वैदिक देवतांचीं, अगर आकाशादि सगुण व्यक्त ब्रह्मप्रतीकाची उपासना सुरू होऊन, अखेर त्याच कारणासाठीं म्हणजे ब्रह्मप्राप्त्यर्थ राम,नृसिंह, श्रीकृष्ण, वासुदेव इत्यादिकांचीं भाति, म्हणजे एक प्रकारची उपासना सुरू झालेली आहे, अशी क्रमवार सरणी एकंदर सर्व उपनिषदांचे