पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/11

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* % 。 गीतारहस्य अथवा कर्मयोग उत्पन्न केला असून, या यज्ञानें तुम्ही आपली समृद्धि करून घ्या, असें त्यानें प्रजेस सांगितलें; आणि हे यज्ञ ज्या अर्थी कमखेिरीज सिद्ध होत नाहीत त्या अर्थ यज्ञ म्हणजेच कर्म होय. म्हणून मनुष्यें व कर्म हैं दोन्हा बरोबरच उत्पन्न झालेली आहत असे म्हटले पाहिजे. पणहीं कर्मकेवळ यज्ञासाठीच असल्यामुळे व यज्ञ हें मनुष्याचे कर्तव्य असल्यामुळे या कर्माचा फलें मनुष्याला वंधक होत नाहीत. आतां हे खरें कीं जो पुरुष ज्ञानी झाला त्याला स्वत:चे म्हणून कांहीं कर्तव्य शिल्लक रहात नाहीं, आणि लोकांच्या ठिकाणे त्याचें कांही अडलेले नसतें. पण तेवढयाने कमें करूं नयेत असें सिद्ध होत नाही. कारण, कर्म कोणालाच सुटत नसल्यामुळे स्वार्थासाठी नको असलें तरी तेंच कर्म लोकसंग्रहाथै आतां निष्काम बुद्वीनें केले पाहिजे असें अनुमान करणे भाग आह(३.१७-१९). या गोष्टा लक्षात आणूनच जनकादि ज्ञानं पुरुषांनी पूर्वी कर्म केली व महि करीत आहं. शिवाय लोकसंग्रह करणे म्हणजे लोकांना आपल्या वर्तनानें चांगला धडा घालून दऊन उन्नतीच्या मागास लाविणे हें ज्ञानी पुरुषाच्या कर्तव्यांपैकीच एक मुख्य कर्तव्य अहिं. मनुष्य कितीहि ज्ञानवान् झाला तरी त्याला प्रकृतीचे व्यवहार सुटत नार्हति; म्हणून कर्म सोडण तर दूरच, परंतु कर्तव्य म्हणून स्वधर्माप्रमाणे कर्म करीत असतां जरूर पडल्यास त्यातच मरणेंहि श्रेयस्कर आह (३. ३०-३५); असा या अध्यायांत भगवंतानी उपदेश केला आहे. भगवंतांनी याप्रमाणें प्रकृतीला सर्व कर्माचे कर्तृत्व दिलेले पाहून मनुष्याची इच्छा नसतांना तो पाप कां करितो असा अर्जुनानें प्रश्न केला तेव्हां कामक्रेाधादि विकार बलात्कारानें मनाला भ्रष्ट करितात, अतएवं इंद्रियांचे संयमन करुन प्रत्यकांन आपले मन ताब्यांत ठेविले पाहिजे, असा जबाब देऊन हा अध्याय समाप्त केला आहे. सारांश, स्थितप्रज्ञाप्रमाणे बुद्धि सम झाला तरी कर्म कोणाला सुटत नाहीं, स्वार्थीसाठी नको तर लोकसंग्रहाथै निष्काम बुद्धीनें कर्म केलेंच पाहिजे, अशा कर्मयोगाची अवश्यकता सिद्ध करून “मला सर्व कर्म अर्पण कर” (३.३०.३१) असे परमेश्वरार्पणपूर्वक कर्म करण्याच्या भक्तिमार्गातील तत्त्वाचेहि याच अध्यायांत ‘सूत उवाच’ झालेले आहे. तथापि हें विवेचन तिसच्या अध्यायांत पुरं न होतां चवथा अध्याय त्याचकरितां आरंभिला आह. आत्ॉर्पयत केललें प्रतिपादनकेवळ अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी नवीन रचिलें असेल अशी शंका येऊं नये म्हणून चवथ्या अध्यायाचे आरंभीं या कर्मयोगाची म्हणजे भागवत किंवा नारायणीयू धर्माची त्रेतायुगांतील परंपरा दिली आहे. आदौ किंवा युगारंभीं मींच हा कर्मयोगमार्ग विवस्वतास, विवस्वानानें मनूस व मनूनें इक्ष्वाकूस सांगितला होता, पण मध्यें नष्ट झाल्यासुळे तोच योग (कर्मयोगमार्ग)मीं आतां तुला पुनः सांगितला, असें श्रीकृष्णांनी म्हटल्यावर