पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/125

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ २ गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट अलीकडे ओढिला पाहिजे. कारण, महाभारतांत मेषवृषभादि राशि नाहींत आण यौधायनाचें “मीनमेषयोर्मेषवृषभयोर्वा वसंतः” असें वचन कालमाधवांत दिलें असून कै. शंकर बाळकृष्ण दीक्षित यांच्या भारतीय ज्योति:शास्रांतहि (पृ. १०२) तें घेतलेले आहे. यावरूनहि महाभारत बौधायनाच्या पूर्वीचे असून शकाच्या पूर्वी निदान चारशें वर्षे बौधायन आणि पांचशे वर्षे महाभारत व गीता होतीं, असें निश्चित अनुमान होतें. कै. काळे यांनी बौधायनाचा काल ख्रिस्तापूर्वी सात आठशें वर्ष धरिला आहे तो बरोबर नाहीं. राशासंबंधीं बौधायनाचे वचन त्यांच्या लक्षांत आलेले नव्हतें. (७) वरीलप्रमाणांवरून हल्लीची गीता शकापूर्वी सुमारें पांचशें वर्ष आस्तित्वांत असून, बौधायन व आश्वलायन यांस ती माहीत होती, आणि तेथपासून तहत श्रीशंकराचार्यापर्यंत तिची परंपरा अविछिन्न दाखवितां येत्ये, असें कोणासहि स्पष्ट दिसून येईल. पण हा सर्व पुरावा वैदिकधर्मीय ग्रंथांतला आहे; आणि आतां आम्ही जें प्रमाण दाखविणार आहेत तें वैदिकेतर म्हणजे बौद्ध वाङ्मयांतले असून त्यानें गीतेचे वर सांगितलेलें प्राचीनत्व स्वतंत्ररीत्या अधिक बळकट व नि:संदिग्ध होतें. बौद्ध धर्मापूर्वी भागवतधर्म उदयास आला होता याबद्दल बुह्वर व प्रसिद्ध फ्रेंच पंडितु सनातै यांचे मतें पूर्वी दिली असून बौद्ध धर्माची वाढ कशी झाली, व हिंदु धर्माशी त्याचा संबंध काय, इत्यादि गोष्टींचे विवेचन पुढील भागांत स्वतंत्र रीतीनें केले आहे. येथे फक्त गीतेच्या कालासबंधानें जेवढा उल्लेख करणें जरूर आहे तवढाच भाग संक्षेपानें देत आहॅी. भागवतधर्म बौद्ध धर्मापूर्वीचा असला तरी केवळ तेवढ्यानेंच गीताहि बुद्धाच्या पूर्वी होती असा निश्चय होऊं शकत नाहीं. कारण, भागवतधर्मीचा आणि गीताग्रंथाचा उदय बरोबर झाला असें म्हणण्यास निश्चित प्रमाण नाही. म्हणून बौद्ध ग्रंथकार गीताग्रंथाचा स्पष्ट उल्लेख कोठे करितात कीं नाहीं हें पहाणें जरूर आहे. प्राचीन बौद्धग्रंथांतहि चारवेद, वेदांगें, व्याकरण, ज्योतिष, इतिहास, निघंटुवगैरेवैदिक धर्मातील ग्रंथ बुद्धाच्या वेळीं झालेले होते असें स्पष्ट लिहिलेले आहे; म्हणून वैदिक धर्म बुद्धापूर्वीच पूर्णतेस आला होता याबद्दल शंका नाहीं. यानंतर बुद्धानें जो नवा पंथ काढिला तो अध्यात्मदृष्टया अनात्मवादी असला तरी आचरणदृष्टया उपनिषदांतील संन्यासमार्गाचेच त्यांत अनुकरण केलेलें होते असें पुढील भागांत दाखविण्यांत येईल. पण अशोकाच्या वेळी बुद्धधर्माची ही स्थिति बदलून बौद्ध भिक्षु रानांत रहाण्याचे सोडून देऊन धर्मप्रसाराचीं व परोपकराची कामें कूरण्यासाठी पूर्वेकडे चिनांत आणि पश्चिमेकड थेट अलेक्झांड्रिया व ग्रीस यथपर्यंत पसरले होते असें दिसून येतें. रानांत रहाण्याचे सोडून लेोकसंग्रहाची कामें करण्यास बौद्ध यति कसे प्रवृत्त झाले हा बौद्ध धर्माच्या