पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/129

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६६ गातारहस्य अथवा कमैयेोग-परिशिष्ट किंवा वैदिकधर्मातले ? व त्यांवरून काय अनुमान निघतें ? इत्यादि प्रश्नाचा निर्णय करण्यास तेव्हां उपलब्ध होणारी साधनें अपुरी असल्यामुळे वरोल चमत्कारिक शब्दसादृश्य व अथैसादृश्य दाखविण्यापक्षां कै. तलंग यांनॅी या बाबतींत जास्त कांहींच लिहिलेले नाहीं. परंतु आतां बौद्ध धर्माबद्दल जी आधक माहिती उपलब्ध झालेली आहे तीवरून या प्रश्नाचा निकाल लागत असल्यामुळे बौद्ध धर्माची ती माहिती येथे थोडक्यांत सांगतो. कै. तेलंग यांनी कलेलं गीतेचे इंग्रजी भाषांतर ज्या ‘प्राच्यधर्मग्रंथमालेत' प्रसिद्ध झाले, त्याच मालंत पुढे बौद्धधर्मग्रंथांचीं जीं ईग्रजी भाषांतरें पाश्चिमात्य विद्वानांनी प्रसिद्ध केली आहेत, त्यांवरून ही बहुतक माहिती गोळा केलेली असून प्रमाणार्थ दाखल केलेले बौद्ध ग्रंथांचे स्थलनिर्देशहेि या मालेतील भाषांतरांसच अनुसरून आहत कांहीं ठिकाणी पाली शब्द किंवा वाक्यें दिली आहेत ती मूळ पाली ग्रंथांतून घेतली आहेत. जैनधर्माप्रमाणें बौद्ध धर्महिंवैदिकधर्मरूप आपल्या पित्यापासून आपल्याला पाहिजे तेवढया संपत्तीचा वांटा घेऊन कांहीं कारणासाठी वेगळा निघालेला मुलगा आहे, अर्थात् तो परकी नसून तत्पूर्वीच्या ब्राह्मणधर्माची येथेच उत्पन्न झालेली एक शाखा आह, ही गोष्ट आतां नि:संशय सिद्ध झाली आहे. सिलेोन बटांतील महावंस किंवा दीपवंसादि जुन्या पाली ग्रंथांत बुद्धानंतरच्या राजांचे व बौद्ध आचार्याच्या परंपरेचे जें वर्णन आहे त्यावरून हिशोब करून पहातां गौतमबुद्ध ऐशीं वर्षांचा होऊन इसवी सनापूर्वी ५४३व्या वर्षी मरण पावला असें निष्पन्न होतें. पण यांत कांहीं गोष्टी असंबद्ध आहेत. सबब प्रेो. मॅक्समुल्लर यांनी या गणनेची सूक्ष्म चर्चा करून बुद्धाचा खरा निर्वाणकाल इ. स. पूर्वी ४७३ असावा असेंम्हटलें असून, डॅॉ. बुहूर यानें तोच काल अशोकाच्या शिलालेखांवरून सिद्ध होतेा असें दाखविले आहे. तथापि प्रेो. हिसडेविड्स किंवा डा. केर्न यांसारखे कांहीं विाकत्सक हा काल याहिपेक्षां पांसष्ट किंवा शंभर वर्ष अलीकडे आोढिला पाहिजे असे म्हणतात; आणि प्रो. गायगर यांनी नुकतेंच या सर्व मताचे परीक्षण करून इ. स. पूर्वी ४८३ बर्ष हा बुद्धाचा खरा निर्वाणकाल होय असें ठरावले आहे,* यांपैकी कोणताहि काल स्वीकारिला तरी बुद्धाचा जन्म होण्यापूर्वीच वैदिक धर्म पूर्णावस्थेस पोंचला होता, व उपनिषदेंच नव्हे, तर धर्मसूत्रांसारखे ग्रंथहि त्यांपूर्वीच तयार

    • Isà Taizot starāād (S. B. E. VOl. X Intro pp. xxxv-xlv) दिलेली असून त्याचे परीक्षण डा. गायगर यांनी १९१२ सालीं प्रसिद्ध झालेल्या आपल्या

महावंशाच्या भाषांतराच्या प्रस्तावनेंत केलेलें आहे तें पहा (The MaAavamsa bv Dr. Geiger, Pali Text Society, Intro. p. xxiii).