पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/136

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ६-गीता व बौद्ध ग्रंथ 3 و ها उपनिषदांतील संन्यासमार्गीजांच्या साधनाचाच त्यानें स्वीकार केला होता, व चातुर्वण्यैभेद किंवा हिंसात्मक यज्ञयाग सोडून देऊन वैदिक गार्हस्थ्यधर्मीतील नीतिनियमच बौद्ध धर्मात थोड्या फरकानें घेतलेले आहेत एवढे सिद्ध झाल्यावर उपनिषदें किंवा मनुस्मृति इत्यादि ग्रंथांतून वैदिक संन्याश्यांचीं जीं वर्णनें आहत ती आणि बौद्ध भिक्षूची किंवा अर्हतांचीं वर्णनें अगर अहिंसादि नीतिधर्म दोन्ही धर्मात एकसारखे-कित्येकदां शब्दशः एकसारखेच-आढळून येतात यांत कांहीं नवल नाहीं. या सर्व गोष्टी मूळ वैदिक धर्मातल्याच आहेत. परंतु केवळ एवढ्याच गोष्टी बौद्धांनीं वैदिक धर्मापासून घेतल्या आहेत असें नाहीं. दशरथजातकासारखे बौद्ध धमोतील जातकग्रंथहि याचप्रमाणें प्राचीन वैदिक पुराणेतिहासकथांचीं बुद्धधर्मानुकूल तयार केलेलीं रूपांतरें आहेत. बौद्धांनींच काय पण जैनांनीं देखील आपल्या अभिनवपुराणांत वैदिक कथांची अशीं रूपांतरें केली आहेत; आणि खिस्तानंतर निघालेल्या महंमदी धर्मात एका ख्रिस्तचरित्राचा असाच विपयसकेलेला आह, असेंसेलसाहेबानें* लिहिले असून, बायबलाच्या जुन्या करारांतील सृष्टयुत्पतीच्या, प्रलयाच्या किंवा नोहाच्या वगैरे कथा प्राचीन खाल्दी लोकांच्या धर्मकथांची अशाच प्रकारचीं रूपातरें करून यहुदी लोकांनी वर्णिलेल्या आहेत, असे अलीकडील शोधांवरून सिद्ध झाले आहे. उपनिषदें, प्राचीन धर्मसूत्रे, किंवा मनुस्मृति यांतील वर्णनें कथा किंवा विचार बौद्ध ग्रंथांतु जर याप्रमाणे-पुष्कळद, अगदीं शब्दशः-घेतलेले आहेत, तर “जयानें वैर वाढतें आणि वैरानें वैरं शमत नाहीं” (मभा. उद्यो. ७१. ५९ व ६३), किंवा “परक्याचा क्रोध शांतीनें जिंकावा” इत्यादि विदुरनीतंतला (मभा. उद्यो. ३८. ७३), अगर “माझा एक बाहु चंदनानं माखला व दुसरा कापला तरी मला त्या दोन्ही गेोष्टी सारख्याच” हा जनकानें म्हटलेला (मभा. शां. ३२०. ३६), अथवा दुसरेहि महाभारतांतले जे बरेचसे श्लोक बौद्ध ग्रंथांत शब्दशः आढळून येतात (धम्मपंद ५व २२३ आणि मिलिंदप्रश्न ७.३.५), ते मूळच महाभारतांतलेच असून तेथून ते बौद्ध ग्रंथकारांनीं घेतले असावे असें साहाजेकरीत्याच अनुमान होतें. पण उपनिषदें, ब्रह्मसूत्रे किंवा मनुस्मृति हे वैदिक ग्रंथ बुद्धापेक्षां निःसंशय प्राचीन असल्यामुळे त्यांतल जे श्वलोक अगर विचार बौद्ध ग्रंथांत आढळून येतात ते बौद्ध ग्रंथकारांनीं सदर वैदिक ग्रंथांतूनच घेतलेले आहत असें ज्याप्रमाणें निःसंशय म्हणतां येतें तशी महाभारताची गोष्ट नाहीं. महाभारतांतच बौद्ध डागेबांचा उल्लेख असल्यामुळे त्याचे शेवटचे संस्करण बुद्ध

  • See. Sale's Koran, “To the Reader'. (Preface), p. x. and

the Preliminary Discourse, Sec. 1 V. p. 58 (Chandos Classics Edition).