पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/21

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*Aく गीतारहस्य अथवा कर्मयोग ध्यान करावें” (गी.१३.२५; “जेो माझी अव्यभिचारिणी भक्ति करितो तोच ब्रह्मभूत होतो”(१४.२६), “पुरुषोत्तमरूप जाणणारा माझीच भक्ति करितो” (गी.१५.१९), आणि अखेरीस अठराव्या अध्यायांत “सर्व धर्म सोडून तूं मला भज” (गी.१८.६६), असा पुनःपुन:भक्तीचाच उपदेश केलेला आढळून येतो. म्हणून केवळ दुसच्या पडध्यायीतच भक्तीचा उपदेश आहे असे म्हणता येत नाहीं. तसेंच ज्ञानाहून भक्ति निराळ असा भगवंतांचा जर अभिप्राय असता तर चवथ्या अध्यायांत ज्ञानाचा प्रस्तावना करून (४.३४-३७) तंच “ज्ञान आणि विज्ञान तुला आतां सांगतों” असें सातव्या अध्यायाच्या म्हणजे वरील आक्षेपकांच्या मतें भक्तेिपर पडध्यायीच्या आरंभी भगवंतांनी म्हटलें नसतें (७.२). यापुढल्या नवव्या अध्यायांत राजविद्या व राजगुह्य म्हणजे प्रत्यक्षावगम्य भक्तिमार्ग सांगितला आहे खरा; पण अध्यायाचे आरंभीच ‘‘विज्ञानसहित ज्ञान तुला सांगतों” (९.१) असे म्हटले आहे. यावरून गातेंत भक्तीचा समावेश ज्ञानांतच केलेला आह हें उघड होतें. दहाव्या अध्यायांत भगवंतांनी आपल्या विभूताचे वर्णन केले आहे; पण त्यालाच अर्जुनानें अकराव्या अध्यायाच्या आरंभीं ‘अध्यात्म? असे म्हटलें आह (११,१); आणि परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपाचे वर्णन चालू असता मधून मधून व्यक्त स्वरूपापक्षां अव्यक्त श्रेष्ठ अशी विधानें आहत, हें वर सांगितलेंच अहि. या विधानांवरून उपासना करणें ती व्यक्ताची करावी का अव्यक्ताची,असा अर्जुनाने बाराव्या अध्यायाच्या आरंभी प्रश्न केल्यावर अव्यक्तापेक्षां व्यक्ताची उपासना म्हणजे भाक्ते सुलभ असें उत्तर देऊन लागलीच तेराव्या अध्यायांत क्षेत्रक्षेत्रज्ञाचे ‘ज्ञान’ सांगण्यास सुरुवात करून सातव्या अव्यायाच्या आरंभाप्रमाणें ववदाव्या अध्यायाच्या आरंभेहि“परं भूथःप्रवक्ष्याभिज्ञानानां ज्ञानमुत्तमम” (१४.१)-फिरून तुला तेंच ‘ज्ञानविज्ञान’ पूर्ण करून राांगतों-असें म्हटले आहे; आणि हें ज्ञान सांगत असतां भक्तीचा धागाहि मधून मधून कायम ठेविला आह. यावरून ज्ञान व भाक्ते ही दोन्हीं पृथक्रीत्या म्हणजे निरनिराळीं सांगण्याचा भगवंताचा उद्देश नसून सातव्या अध्यायांपासून सुरू झालेल्या ज्ञानविज्ञानांतच दोन्ही एकेच ठिकाणी गुंफलेला आहत असें स्पष्ट होतें. भाति निराळी व ज्ञान निराळे,हें त्या त्या संप्रदायाच्या अभिमान्यांनीं माजविलेलें रवृळ आहे; गीतेचा अभिप्राय तसा नाहीं. अव्यक्तोपासनेंत (ज्ञानमार्गात) अध्यात्मविचारानें परमेश्वरस्वरूपाचें जें ज्ञान करून घ्यावें लागतें, तेंच भक्तीलाहि अवश्यक आहे; पण व्यक्तोपासनेंत (भाक्तमार्गात) तें ज्ञान आरंभीं दुस-यापासून श्रद्धेनें प्रहण करितां येतें (१३.२५), म्हणून भाक्तेमार्ग प्रत्यक्षावगम्य व सामान्यतः सर्व लोकांसच सुखकारक (९.२), आणि ज्ञानमार्ग (किवा अव्यक्तोपासना)केशमय(१२.५)होतो,