पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/3

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १४ वें गीताध्यायसंगति, - *:4:* - प्रवृातिलक्षणं धर्म ऋषिर्नारायणोऽव्रवीत् ।। * महाभारत, शांति. २१७.२. क करीत असतांच अध्यात्मविचारानें किवा भक्तीनें सर्वात्मैक्यरूप साम्यबुद्धि पूर्णपणें संपादन करणें, व ती प्राप्त झाल्यावरहि संन्यास घेण्याच्या भरीस न पडतां संसारात शास्रतः प्राप्त झालेली सर्व कमें केवळ कर्तव्य म्हणून नेहमीं करीत राहणें, हाच या जगांत मनुष्याचा परमपुरुषार्थ किवा आयुष्यक्रमणाचा उत्तम मार्ग होय, असें भगवद्गीतेंत म्हणजे भगवंतांनीं गाईलेल्या उपनिषदांत प्रतिपादन केले आह, हें आतांपर्यंतच्या विवेचनावरून दिसून येईल. तथापि ज्या क्रमानें आम्हीं या ग्रंथांत हा अर्थ वर्णिला आहे त्यापेक्षां गीताग्रंथांतील क्रम निराळा असल्यामुळे याच विषयाची भगवद्गीतेंत कशी मांडणी केली आहे याचेंहि थोडेसें परीक्षण करणे जरूर आहे. कोणत्याहि विषयाचे नेिरूपण दोन पद्धतींनीं करितां यतं; एक शास्त्रीय व दुसरी पौराणिक. पैकीं सर्व लोकांस सहज कळणाच्या गोष्टंपासून प्रतिपाद्य विषयाची मूलतत्त्वें कशी निष्पन्न होतात हें साधकबाधक प्रमाणांची तर्कशास्त्रानुसार क्रमवार मांडणी करून दाखविणें यास शास्त्रीय पद्धत असे नांव आहे. भूमतिशास्र हें या पूद्धतीचे उत्कृष्ट्र उदाहरण असून, न्यायसूत्रं किंवा वेदान्तसूत्रे यांतील उपपादनहि याच वर्गात येतें. म्हणून भगवद्गतेिंत ब्रह्मसूत्रांचा म्हणजे वेदान्तसूत्रांचा जेथे उल्लेख आहे तेथे त्यांतील विषय हेतुयुक्त व निश्चयात्मक प्रमाणांनी सिद्ध केलेला असल्याचे वर्णन आले आहे-“ब्रह्मसूत्रपदैचैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः” (गी. १३. ४). परंतु भगवद्गतंतील निरूपण सशांस्र असले तरी तें या म्हणजे शास्रीय पद्धतीनें केलेले नाही. भगवद्गीतंतील विषय श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवादाच्या सुलभ व मनोरंजकरूपानें वर्णिला आहे; व त्यामुळे प्रत्येक अध्यायाचे शेवटीं “भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां येोगशास्ने” असे शब्द आल्यावर पुढे “श्रीकृष्णार्जुनसंवादे” असें गीतानिरूप*“नारायण ऋषींनी धमै प्रवृत्तिपर स्ॉगितला आहे.” नर् आणि नारायण या दोन ऋषींपैकींच हे नारायण ऋषि होत; व या दोघृांचेच अनुक्रम अर्जुन व श्रीकृष्ण हे अवतार होतेहूँपूर्वीसांगितले आहे. तसेंच नारायणीय धमैच गीतेत ਮੋਂ महाभा

  • > ميمه

रतांतील वचन मार्गे दिलेले आहे.