पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/35

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहह्य अथवा कर्मयोग يمة قا لا तर्पणानें वदेणग्यांनी लाखों लौक तृप्त होऊन युधिष्ठिराची प्रशंसा करूं लागले. तेव्हां तेथे एक दिव्य मुंगूस(नकुल)येऊन तो त्यांस असे म्हणू लागला कीं,“तुमची प्रशंसा फुकट आहे. पूर्वी याच कुरुक्षेत्रांत उंच्छवृत्तीच्या म्हणजे शेतांत पडलेले दाणे टिपून त्यांवर निर्वाह करणाच्या एका दरिद्रो ब्राह्मणानें, आपण व बायकापोरें कित्येक दिवस उपाशी असतांहि, ऐन भोजनाचें वेळीं अकस्मात् घरीं आलेल्या क्षुधित अतिथीस आपल्या व आपल्या बायकामुलांच्या पुढचे सतूचे सर्व अन्न समर्पण करून जो अतिथियज्ञकेला त्याची सर युधिष्ठिराचा यज्ञ कितीहि मोठा झाला तरी त्यास येऊं शकत नाहीं” (मभा. अश्व. ९०). या मुंगुसाचे तोंड व अर्धे अंग सोन्याचे होतें, व युधिष्ठिराच्या यज्ञाची योग्यता गरीब ब्राह्मणानें अतिथीस दिलेल्या शरभर सतूबरोबर नाहीं, असे म्हणण्याचे कारण त्यानें असें सांगितलें कीं,-“ब्राह्मणाचे घरीं आतिथीच्या उष्टयांत लोळल्यानें आपलें तोंड व अर्धे अंग सोन्याचे झाले; पण युधिष्ठिराच्या यज्ञमंडपांतील उष्टयांत लोळल्यानें बाकीराहिलेलें अंग सोन्याचे होईना !” या स्थलीं कर्माच्या बाह्य परिणामाकडे नजर देऊन पुष्कळांचे पुष्कळ हित कशांत होतें याचा जर आपण विचार केला तर एका आतिथीस तृप्त करण्यापेक्षां लाखों लेोकांस तृप्त करण्याची योग्यता लाखपट आधिक आहे, असा निर्णय करावा लागेल. पण केवळ धर्मदृष्टयाच नव्हे तर नीतिदृष्टयाहेि हा निर्णय बरोबर होईल काय ? कोणालाहि पुष्कळ द्रव्य मिळणे किंवा लोकोपयोगाचीं मोठमोठीं कामें करण्याची संधि सांपडणें हें केवळ त्याच्या सद्ववर्तनावरच अवलंबून असत नाहीं; आणि गरीब ब्राह्मणास द्रव्याभावीं मोठा यज्ञ करितां आला नाही म्हणून त्यानं यथाशक्ति केलेल्या स्वल्प कृत्याची नैतिक किंवा धार्मिक किंमत जर कमी समजावाची, तर गरीबानें श्रीमंताप्रमाणें नीतिमान् व धार्मिक होण्याची कधींच आशा बाळगावयास नको असें प्राप्त होईल. आत्मस्वातंत्र्याप्रमाणे आपली बुद्धि शुद्ध ठेवणें ही गोष्ट ब्राह्मणाच्या ताब्यांतली होती; आणि त्याच्या स्वल्पाचरणावरून त्याचा परोपकारबुद्धि युधिष्ठिराइतकीच शुद्ध होती याबद्दल जर कांहींच संशय रहात नाही तर त्याची व त्याच्या स्वल्प कृत्याची नैतिक किंमत युधिष्ठिर व त्याचा भपकदार यज्ञ यांच्या तोडीचीच मानिली पाहिजे. किंबहुना दरिद्री व कित्येक दिवस उपाशी असतांहि अन्नसंतर्पणानें आतिथीचे प्राण वांचविण्यासाठीं ब्राढाणानें जो स्वार्थत्याग केला त्यावरून त्याची शुद्धबुद्धि अधिक व्यक्त होत्ये असैहि म्हणतां येईल. कारण धैर्यादि गुणांप्रमाणें शुद्ध बुद्धीची खरी परीक्षा संकटकालीच होत असत्ये ही गोष्ट सर्वमान्य असून, संकटाचे वेळीं सुद्धां ज्याचे नैतिक सत्त्व ढळत नाहीं तोच खरा नीतिमान् असें कान्ट यानेंहि आपल्या नीतिग्रंथांच्या आरंभों प्रतिपादन केले आह. मुंगुसाचा अभिप्राय असाच होता.'पण राज्यारूढ झाल्या