पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/4

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीताध्यायसंगति *? णाच्या स्वरूपाचे दशक शब्द येत असतात. या निरूपणांतलि आणि ‘शास्रयि? निरूपणांतील भेद स्पष्टपणे दाखविण्यास संवादात्मक निरूपणास ‘पौराणिक' असें नांव आम्हीं दिले आह. सातशें श्वलोकांत केलेल्या अशा प्रकारच्या संवादात्मक किंवा पौराणिक निरूपणांत ‘धर्म’ या व्यापक शब्दांत समावेश होणाच्या सर्व विषयांचा सविस्तर ऊहापेोह करणें कधीच शक्य नाहीं. पण त्रोटक रीतीनेंच कां होईना, गीतेंत जे अनेक विषय उपलब्ध होतात तेवढयांचा तरी त्यांत आविरोधानें कसा संग्रह करितां आला हेंच आश्चर्य आहे. आणि त्यावरून गीताकारांचें अलैकिक सामथ्यै व्यक्त होऊन गीतेंतील उपदेश ‘अत्यंत योगयुक्त चित्तानें'सांगितलेला आह, असें जें अनुगातेच्या आरंभी म्हटलें आहे त्याची सत्यता प्रत्ययासयेत्ये. अर्जुनाला जे विषय पूर्वीच अवगत होते ते पुनः सविस्तर सांगण्याचे कांहीं कारण नव्हतें. मी लढाईचे धोरकर्म करूं का नको, आणि कर म्हटल्यास कसें करूं, हा त्याचा मुख्य प्रश्न होता: व श्रीकृष्णांनी आपल्या उत्तरांत एखादा युक्तिवाद सांगितला म्हणजे त्यावर अर्जुन दुसरे आक्षप घेत होता. अशा प्रकारें चाललेल्या प्रश्नोत्तररूपो संवादांत गीतेंतील विवेचन साहजिकरीत्याच कधीं त्रोटक किंवा संक्षिप्त तर कधीं द्विरुक्त झाले आहे. उदाहरणार्थ, त्रिगुणात्मक प्रकृतीच्या पसायाचे वर्णन थेोड्या भेदानें दोन ठिकाणी (गी. अ. ७ व १४), तर स्थितप्रज्ञ, भगवद्भक्त, त्रिगुणातीत आणि ब्रह्मभूत, यांच्या स्थितीचे वर्णन एक असतांहि त्याची निरनिराळ्या दृष्टीनें दरएक प्रसंगीं पुनरुक्तिकेलेली आहे. उलटपक्षीं अर्थ व काम हे धर्माला सोडून नसतील तेव्हां ग्राह्य होत या तत्त्वाचे “धर्माविरुद्धः कामोऽस्मि” (७.११) या एकाच वाक्यांत दिग्दर्शन केले आहे. याचा परिणाम असा होतो की, गीतेमध्यें जरी सर्व विषय आले आहेत तरी श्रौतधर्म, स्मार्तधर्म, भागवतधर्म, सांख्यशास्र, पूर्वमीमासा,वेदान्त, कर्मविपाक,इत्यादिकांतील ज्या प्राचीन सेिद्धान्तांच्या आधारें गीर्तेतील ज्ञानाचें निरूपण केले आहे त्यांची परंपरा ज्यास अवगत नाहीं त्याचे मन गीता वाचितांना गोंधळून जातें; आणि प्रतिपादनाचा सरणी नीट लक्षांत न येतां गीता म्हणजे कांहीं तरी गौडबंगाल आहे, अथवा शास्रीय पद्धत प्रचारांत येण्यापूर्वी गीता उपदशिली असावी आणि त्यामुळे गीतेंत ठिकठिकाणी अपुरेपणा आणि विरोध भरलेले आहेत, किंवा निदान आपल्या बुद्धीला तरी गीतंतील ज्ञान अगम्य होय, अशी समजूत होत्ये संशयनिवृत्तीसाठीं टीका पहाव्या तर त्याहि बहुतेक भिन्नभिन्न संप्रदायांना धरूनकेलेल्या असल्यामुळे टीकाकारांच्या मतांमधील परस्परविरोधांची एकवाक्यता करणें दुर्घट होऊन मन अधिकच गोंधळून जातें. कांहीं सुप्रबुद्ध वाचकहि अशा प्रकारच्या भ्रांतींत पडलेले आम्हांस माहीत आहेत. ही अडचण राहूं नये म्हणून गीतेंतील प्रतिपाद्य विषयांची