पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/45

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Yくみ गीतारहस्य अथवा कमैयोग मश्वर'(परमात्मा), ‘अमृतत्व’ आणि ‘(इच्छा-) स्वातंत्र्य’ यासंबंधाचे गूढ प्रश्न मनुष्याचे मनांत उद्भवलेले आहेत; आणि या प्रश्नाचीं उत्तरें न देतां नीतीची उपपत्ति कोणत्याहिकेवळ बाह्य सुखाच्या हिशेबानें लावणे म्हणज मनुष्याच्या मनांतील विषयसुखासलुब्ध होणाच्या पशुवृत्तीस उत्तेजनदेऊन खच्या नीतिमतेच्या मूळपायावरच कुन्हाड घालण्यासारखें आहे.::गीतेंत कर्मयोग प्रतिपाद्य असतांत्यांतंच शुद्ध वेदान्त कसा व कां आला, हें आतां निराळे सांगावयास नको. कान्ट यानें या विषयावर“शुद्ध (व्यवसायात्मक) बुद्धीची मीमांसा”आणि “व्यावहारिक (वासनात्मक) बुद्धीची मीमांसा” असे दोन ग्रंथ लिहिले आहेत. पण भगवद्गीर्तत आमच्या औपनिषदिक तत्त्वज्ञानाप्रमाणे या दोन्ही विषयांचा समावेश झालेला आहे, इतकेंच नव्हे, तर श्रद्धामूलक भक्तिमार्गाचेहि विवेचन त्यांतच केलेले असल्यामुळे गीतासर्वतोपरी ग्राह्य व प्रमाणभूत झालेली आहे. मीक्षाला क्षणभर बाजूला ठेवून केवळ कर्माकमीच्या परीक्षणाचें नैतिक तत्त्व या दृष्टीनेंहिं ‘साम्यबुद्धि'च जर श्रेष्ठ ठरत्ये, तर गीतेंतील आध्यात्मिक पक्षाखेरीज नीतिशास्रांत दुसर पंथ कसे व का निर्माण झाले याचाहि थोडा विचार करणें जरूर आहे. डॅी. पॅलि कॅरस+ नांवाचा एक प्रसिद्ध अमेरिकन ग्रंथकार आपल्या नीतिशास्रावरील ग्रंथांत या प्रश्नाचे असें उत्तर देतेो कीं, “पिंडब्रह्मांडाच्या रचनेसंबंधानें मनुष्याचे जें मत असतं, त्याप्रमाणें नीतिशास्रांतील मूळ तत्त्वांबद्दलच्या "Empiricism, on the contrary, cuts up at the roots the morality of intentions (in which, and not in actions only, consists the high worth that men can and ought to give themselves) ...Empiricism, moreover, being on this account allied with all the inclinations which (no matter what fashion they put on)degrade humanity when they are raised to the dignity of a supreme practical principle,...is for that reason much more dangerous.” Kant's Zheory of Ethics, p. p. 163, and 236-239. See also Kant's Critique of pure Reason, (trans. by Max Muller) 2nd Ed. pp. 6 to 657 t See The Ethical Problem, by Dr. Carus, 2nd Ed p. III. “Our proposition is that the leading principle in ethics must be derived from the philosophical view back of it. The worldconception a man has, can alone give character to the principle in his ethics. Without any world-conception we can have no ethics (i. e. ethics in the highest sense of the word). We may act morally like dreamers or somnambulists, but our ethics would in that case be a mere moral instinct without any rational insight into its raison d'etre” o