पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/52

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपर्सद्दरं Yく% त्याप्रमाणेंच मूळ ख्रिस्ती धर्माचेहि म्हणणे आहे. “तू आपल्या शेजाच्यावर आपल्याप्रमाणेच प्रीतिकर” असें ख्रिस्तानें (माथ्यू.१९.१९), तर “तूं जें खातेोस, पितोस, वा करितोस,तें सर्व ईश्वरासाठीं कर” असें पॅलि यानें म्हटले आहे (१कारेिं.१०.३१); आणि हे दोन्ही उपदेश आत्मौपम्यबुद्धीनें ईश्वरार्पणपूर्वक कमें करण्याचा गीतेंत जो उपदेश आहे तत्सदृश आहेत (गी.६.२९ व ९.२७). पण तेवढयानें गीताधर्मीप्रमाणे ख्रिस्ती धर्म प्रवृतिपर आहे, असें सिद्ध होत नाहीं. कारण, मनुष्याला अमृतत्व मिळून तो मुक्त व्हावा हेंच ख्रिस्ती धर्मातहि अखेरचे साध्य आहे; आणि तें साध्य घरदार सोडिल्याखेरीज प्राप्त होत नाहीं असें प्रतिपादन केले असल्यामुळे ख्रिस्ताचा मूळ धर्म संन्यासपरचू म्हटला पाहिजे. ख्रिस्त स्वतः शेवटपर्यंत अविवाहित होता इतकेंच नव्हे, तर “आईबापांवर किंवा शेजाच्यावर प्रीति कर, हे सर्व धर्म यावज्जन्म मी पाळीत आली आहे, आतां पूर्ण अमृतत्व मिळण्यास अद्याप माझ्यांत काय कमी आहे तें मला सांगा,” असा जेव्हां एका गृहस्थानें त्यास प्रश्न केला, तेव्हां “घरदार विकून टाकून किंवा गरीबाला देऊन तूं माझा भक्त बन,” असें ख्रिस्तानें त्यास साफ उत्तर दिले आहे '! ६-३० व मार्क.१०.२१-३१); व पुढे लागलीच आपल्या शिष्यांकडे वळून त्यांस असें सांगितले आहे की, ‘‘उंट सुईच्या नेढयांतून एकवार पार जाऊं शकेल, पण ईश्वराच्या राज्यांत श्रीमंतांचा प्रवेश होणे कठिण आहे.” “अमृतत्वस्य तु नाशास्ति वितेन”(बृ २.४.२)-द्रव्यानें अमृतत्व मिळण्याची आशा नको-असा याज्ञवल्क्यानें मैत्रेयीस जो उपदश केला त्याचीच ही नकल्ल आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अमृतत्व मिळण्यास सांसारिक कर्मे सोडण्याची जरूर नाहीं, तींच निष्काम बुद्धीनें केला म्हणजे झाले असा गीतेप्रमाणें ख्रिस्तानें कोटेंच उपपश केलेला नाहीं. उलट ऐहिक संपत्ति व परमेश्वर या दोहोंमध्यं कायमचा विरोध आहे (माथ्यू. ६. २४), म्हणून “आईबाप, घरदार, बायकामुलें, बहिणभाऊ यांचा किंबहुना स्वत:च्या जीविताचाहि द्वेष करून जो पुरुष माझ्याच मार्गे येत नाहीं, तो माझा भक्त होणें कधींच शक्य नाहीं” (ल्यूक.१४.२६-३३), असा ख्रिस्ताचा, तर “स्रियांस स्पर्श देखील न करणे हाच उत्तम पक्ष होय” (१ कारिं.७.१), असा ख्रिस्ताचा शिष्य पॅॉल याचा स्पष्ट उपदेश आहे. तसेंच “आपली जन्मदात्री आई* आपल्याला काय होय ? आपल्या भोवतालचे ईश्वरभक्तहेच आपले आईबाप व बंधु होत,” (माथ्यू.१२.४६५०)असे ख्रिस्ताच्या तोंडांतून निघालेले उद्गार, आणि “किं प्रजया करिष्यामो

  • संन्यासमागीयांचा हा नेहमींचाच उपदेश आहे. “का ते कान्ता कस्ते पुत्रः' हा शंकराचार्याचा क्षेोक प्रसिद्ध असून अश्वघोपाच्या ಶ್ಗ (६.४५) बुद्धाच्या तोंडून

भ५ “काहं मातुः क सा मम” असे उद्गार निघाल्याचे वर्णन आहे.