पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/70

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १-गीता व महाभारत هاo و योग्य आहे, असें यावरून दिसून येईल. गीतेंतील प्रतिपाद्य विषय आणि गीता भारतांत ज्या ठिकाणीं सांगितली आहे तें स्थल, या दोहोंचीहि याप्रमाणे नीट उपपति लागल्यावर गीतेंतील ज्ञान रणभूमीवर सांगण्याचे कारण नाही, हा ग्रंथ मागाहून कोणीं तरी महाभारतांत धुसडून दिला असावा, अथवी भगवद्गीतेंत दहा श्रुठाक मुख्य किंवा शंभर मुख्य, हे प्रश्न आतां शिश्क रहात नाहीत. कारण, धर्मनिरूपणार्थ भारताचे महाभारत करण्यास अमुक विषय महाभारतांत अमुक कारणासाठीं अमुक ठिकाणीं घातले पाहिजेत असें एकदां ठरल्यावर, त्या विषयाचे पूर्ण निरूपण करण्यास केितीहि जागा लागली तरी महाभारतकार त्याची पर्वा करीत नाहीत, असें इतर प्रकरणांवरूनहि दिसून येतें. तथापि गीतेच्या बहेिरंगपरीक्षणासंबंधानं दुसच्या ज्या कोट्या निवfल्या आहेत त्यांचाहिं प्रसंगानुसार विचार करून त्यांत तथ्य किती आहे हें पहाणे अवश्य असल्यामुळे त्यापैकीं (१) गीता व महा भारत, (२)गीता व उपनिपदें, (३) गीता व ब्रह्मसूत्रे, (४) भागवतधर्माचा उदय व गीता, (५) हल्लींच्या गीतेचा काल, (६) गीता व वीद्ध ग्रंथ, आणि (७) गीता व ख्रिस्ती बायबल, या सात विषयांचा या प्रकरणाच्या पुढील सात भागांत क्रमशः विचार केला आहे. हा विचार करितांना महाभारत, गतिा, श्रह्मसूत्रे, उपनिषदें वगेरे ग्रंथांचे विवेचन केवळ काव्य या नात्यानें म्हणजे व्यावहारिक व ऐतिहासिक दृष्टयाच बहिरंगपरीक्षक करीत असल्यामुळे आम्हीहि वरील प्रश्नाचा त्याच दृष्टीनें आतां विच}र करणार आहेोत एवढें प्रथम सागितले पाहिजे. भाग १-गीता व महाभारत. श्रीकृष्णासारख्या थोर महात्म्यांच्या चरित्रांच्या नैतिक समर्थनार्थ कर्मयोगपर गीता महाभारतांत थोग्य कारणांसाठी योग्य स्थळ आली असून महाभारताचाच गीता हा एक भाग असला पाहिजे, असै जे वर अनुमान केलं तेंच या दोन्ही ग्रंथांच्या रचनेची तुलना केली असतां दृढ होतें. पण तशी तुलना करण्यापूर्वी या दोन ग्रंथांच्या प्रस्तुतच्या स्वरूपावद्दल थोडा विचार केला पाहिजे. गीताग्रंथांत सातशें लोक आहेत असें श्रीमच्छंकराचार्यांनी आपल्था गीताभाष्यांत आरंभ च स्पष्ट म्हटलें असून हल्लीं उपलब्ध असलेल्या सर्व प्रतfत तितकेच लोक आढळून येतात. या ७०० श्लोकांपैकी १ लोक धृतराष्ट्राचा, ४० संजयाचे, ८४ अर्जुनाचे आणि ५७५भगवंताचे आहेत. परंतु मुंबईत गणपत कृष्णाजीच्या छापखान्यांत छापिलेल्या महाभारताच्या प्रतीत भीष्मपर्वात गीतेचे अठरा अध्याय संपल्यावर जो अध्याय लागतो त्याच्या म्हणजे भीष्मपर्वाच्या त्रेचाळिसाव्या अध्यायाच्या आरंभों साडेपांच लोकांत जें गीतामाहात्म्य वर्णिलें आहे, त्यांत