पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/73

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

oላማ o गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट भक्ति करून जगांतील व्यवहार स्वधर्माप्रमाणें करीत राहिल्यानेंच मोक्षप्राप्ति होत्ये, असें या भागवतधर्माचें तत्त्व असून भगवद्गीतंतहिं याचप्रमाणे कर्मयोग संन्यास मार्गपेक्षां श्रेष्ठ असें प्रतिपादन आह, हें आम्हीं पूर्वीच्या प्रकरणांतून दाखविले आहे. या नारायणीय धर्माच्या परंपरेचे वर्णन करितांना वैशंपायन जनमेजयास असें सांगतों कीं, हा धर्म साक्षात् नारायणापासून नारदास प्राप्त झाला असून तोच धर्म “कथितो हरिगीतासु समासविधिकल्पतः” (मभा. शां. ३४६.१०)हरिगीतेंत किंवा भगवद्गीर्तेत सांगितला आहे. तसेंच पुढें अध्य्य.३४८ लोक ८ यांत— समुपोद्वेष्वनीकेषु कुकूपांडवयोर्मृधे । . अजुन ! बमनु स्क च शाता भगवता स्वयम् । ऐकान्तिक किंवा नारायणधर्माचे हे विधि पृर्वी कौरवपांडवांच्या युद्धप्रसँगीं विमनस्कू झालेल्या अर्जुनास भगवंतांनी उपदशिले आहत असें सांगून व नारायणधर्माची सर्व युद्धांतील परंपरादेऊन, हृा धर्म आणि यतीचा म्हणजे संन्यासधर्म मिळून दोन्ही ‘हरिगीतेंत' सांगितले आहेत असें पुनः म्हटलें आहे.(मभा.शां ३४८.५३).आदिपर्व आणि शांतिपर्व यांत अलिल्या या सहा उल्लेखांखेरीज अश्वमेधपर्वातल्या अनुगीता. पर्वातहि आणखी एकदां भगवद्गीतेचा उल्लेख अहि. भारती युद्ध समाप्त होऊन युधिष्ठिरास राज्याभिषेक आल्यावर कांहीं दिवसांना श्रीकृष्ण व अर्जुन एकत्र बसले असता श्रीकृष्णांनीं “आतां मला येथे रहाण्याचे कारण नाहीं: द्वारकेस जाण्याची इच्छा आह;” अशी गोष्ट काढिल्यावर अर्जुनानें मर्गे युद्धाच्या आरंभीं तुम्ही मला जी उपदेश केला तो मी विसरलों, यासाठीं पुनः तीच उपदेश मला सांगा, अशी श्रीकृष्णास विनंति केला (अश्व.१३)तेव्हां या विर्नतीप्रमाणें श्रीकृष्णानीं द्वारकेस जाण्यापूर्वी अर्जुनास अनुगीता सांगितली आहे. या अनुगीतेंत प्रथम “युद्धारंभीं तुला जो उपदेश केला तो विसरलास हें तुझें दुर्दैव होय. तो उपदश पुनः तसाच सांगतां येणें मलाहि शक्य नाही; म्हणून त्याऐवजीं दुसच्या कांहीं गोष्टी तुला सांगतो.” (मभा.अश्व.अनुगीता १६.९-१६ असें भगवंतांनीच म्हटलें असून अनुगीतेंतील कांहीं प्रकरणेंहि गीतेतल्या प्रकरणांसारखी आहेत. अनुगीतेंतील या निर्दशासुद्धां महाभारतांतलाच भगवद्गीतचा सातदां स्पष्ट उल्लेख आहे. अर्थात् भगवद्गीता हा हल्लींच्या महाभारतांतलाच एक भाग आहे असें त्यांतील अंतर्गत पुराव्यावरून स्पष्ट सिद्ध होतें. परंतु शंकेची गति निरंकुश असल्यामुळे वरील सातहि निर्देशांनी कित्येकाचें समाधान न होतां,हे उल्लेखहि भारतांत मागाहून घुसडलेले नसतील कशावरून, असें यावर त्यांचे म्हणणे आहे, व त्यामुळे गीता हा महाभारताचा भाग आह कीं नाहीं ही शंका त्यांचे मनांत कायम रहात्थ. गतिाग्रंथ केवळ ब्रह्मज्ञानपर आहे