पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/80

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १--गीता व महाभारत ༦༣ ཤི ༥༠ ज्यांच्याकरितां उपभोग प्राप्त करून घ्यावयाचे त्यांनाच ठार मारल्यावर मग जय मिळाला तरी काय उपयेाग, असें अर्जुनानें गीतेच्या आरंभीं म्हटले आहे (गी.१.३२ ३३); तर पुढे युद्धांत सर्व कौरवांचा क्षय झाल्यावर तेच उद्गार दुर्योधनाच्या तोंडांतूनहि निघाले आहेत (शल्य.३१.४२-५१).दुसच्या अध्यायाचे आरंभींच सांख्य व कर्मयोग या दोन भिन्न निष्ठा ज्याप्रमाणे सांगितल्या तद्वत् नारायणीय धर्मातच नव्हे, तर शांतिपर्वांतहि जापकोपाख्यानांत व जनकसुलभसंवादांत या निष्ठांचे वर्णन आह (शां.१९६व ३२०); आणि तिसच्या अध्यायांतील अकर्मापेक्षां कर्म श्रेष्ठ, कर्म न केलें तर पोट देखील भरणार नाहीं, इत्यादि विचार वनपवीचे आरंभीं द्रौपदीनें युधिष्ठिरास सांगितले असून (वन. ३२), अनुगीतेंतहि याच तत्त्वांचा पुनः उल्लेख आह. श्रौतधर्म किंवा स्मार्तधर्म यज्ञमय आहे, यज्ञ आणि प्रजा ब्रह्मदेवानें बरोबर निर्माण केल्या, इत्यादि गीतेंतील प्रवचन नारायणीय धर्माखेरीज शांतिपर्वात इतर ठिकाणीं (शां.२६७) व मनुस्मृतीतहि आले असून(मनु.३), स्वधमप्रिमाणे कर्म करण्यांत पाप नाहीं हे विचार तुलाधारजाजलिसंवादांत व ब्राह्मणव्याधर्सवादांतहि आलेले आहत(शां.२६०-२६३व वन.२०६-२१५). याखेरीजसृष्टयुत्पत्तींची जी थोडी हकीगत गीतेच्या सातव्या व आठव्या अध्यायांत आहे तद्वतच शांतिपर्वांत शुकानुप्रश्नांत वर्णन असून (शां.२३१) सहाव्या अध्यायांत पार्तजलयेोगाच्या आसनांची जी माहिती आहे तीच पुनः शुकानुप्रश्नांत (शां.२३९) व पुढे शांतिपर्वाच्या ३०० व्या अध्यायांत व अनुगीतेंतहि सविस्तर सांगितली आहे (अश्व.१९). अनुगीतेंतील गुरुशिष्यसंवादांतलें मध्यमोत्तम वस्तूंचे वर्णन (अश्व.४३व४४) आणि गीतेच्या दहाव्या अध्यायांतील विभूतिवर्णन, ही तर बहुतेक एकार्थक आहेत असें म्हणण्यास हरकत नाही. गीतेंत भगवंतांनीं अर्जुनाला जें विश्वरूप दाखविंलें तेंच शिष्टाईचे वेळीं दुर्योधनादि कौरवांस व पुढे लढाई संपल्यानंतर द्वारकेस परत जातांना वाटेंत उतंकास, आणि नारायणांनी नारदास व दाशरथि रामानें परशुरामास दाखविले, असें महाभारतांत सांगितलें आहे (उ.१३०;अश्व.५५;शां.३३९;वन९९). गीतंतील विश्वरूपवर्णन या चारी ठिकाणच्या वर्णनांपेक्षां सरस व विस्तृत आहे खरें; पण अर्थसादृश्याच्या दृष्टीनें विचार करितां त्यांत कांहीं नवें नाहीं, असें ही सर्व वर्णनें वाचिली असतां सहज दिसून येईल. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांमुळे सृष्टींत वैचित्र्य कसें निर्माण होतें, या गुणांचीं लक्षणे कोणती आणि सर्व कर्तृत्व गुणांचे आहे, आत्म्याचे नव्हे, इत्यादि प्रकारचे गीतेच्या चवदाव्या व पंधराव्या अध्यायांत जें निरूपण आहे त्याच नमुन्याचे या तीन गुणांचे वर्णन अनुगीतेंत (अश्व. ३१-३९) आणि शांतिपर्वातहि ठिकठिकाणीं आलं आह (शां २८५क५००