पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/85

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२२ गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट विचार व वाक्यें बृहदारण्यकांतील आहेत असें सदर उपनिषदें ज्यानें वाचिलीं असतील त्याला सहज़ कळून येईल. पण गद्यात्मक उपनिषदें सोडून पद्यात्मक उपनिषदें घेतलीं तर हें सामेय याहून अधिक चांगलें व्यक्त होतें. कारण, या पद्यात्मक उपनिषदांतील कांही »लोक जसच्या तसेच भगवद्गीतंत घेतले आहेत. उदाहरणार्थ, कठोपनिषदांतील सहासात »लोक अक्षरशः किंवा थोडया शब्दभेदानें गीतेंत आले आहेत. गीतेच्या दुसच्या अध्यायांतील “आश्वर्यवत्पश्यति०”(२.२९) हा »लेोक कठोपनिषदाच्या दुस-या वल्लॉतील “आश्चर्यो वक्ता०”(कठ.२.७)या »लोकाशी सदृश असून, “न जायते ध्रियते वा कदाचित्०”हा »लोक (गी.२.२०) आणि “यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरन्ति०”(गी.८.११) हें »लेोकार्ध गीतंतं व कठोपनिषदांत अक्षरशः एकच आहे (कठ.२ १९;२.१५). “ईद्रियाणि पराण्याहुः०” (गी. ३. ४२) हा गीतेंतील »लोक कठोपनिषदांतला आहे (कठ.३.१०) हें पूर्वी सांगितलेंच आह. त्याचप्रमाणें गीतेंतल्या पंधराव्या अध्यायांतील अश्वत्थवृक्षाचे रूपक कठोपनिषदांतून, आणि “न तद्भासयते सूर्यो०” (गी.१५.६) हा ×लोक कठ वू श्वेताश्वतर उपनिषदांतून थोड्या शब्दभेदानें गीर्तत घेतला आहे. श्वेताश्वतरोगनिषदांतल्या दुसच्या पुष्कळ कल्पना व १ लोकहि गीतेत आहेत. माया हा शब्द प्रथम श्वेताश्वतरोपनिषदांत आला असून तेथूनच तो गोतंत व महाभारतांत घेतला असावा हें नवव्या प्रकरणांत आम्हf दाखविलें अहिं. याखेरीज गीतेच्या सहाव्या अध्यायांत “शुचौ देशे प्रतिष्ठाप्य०” (गी. ६.११) असें जें योगाभ्यासास योग्य स्थलाचे वर्णन आहे तें“समे शुचौं०” इत्यादि (श्वे.२.१०)मंत्रावरून आणि “समंकायशिरोग्रीवं०” (गी.६.१३) हे शब्द “त्रिरुन्नतं स्थाप्य समं शरीरम्” (श्वे. २. ८) या श्रेताश्वतरोपनिषदांतील मंत्रावरून घेतले आहत असें शब्दसादृश्यावरून उघड होतें तसेंच “सर्वत:पाणिपादं०” हा »लोक व त्याचा पुढील श्लोकार्धहि गीतेंत (१३.१३)व श्वेताश्वतरोपनिषदूांत शब्दशः आढळतात (श्वे.३.१६); आणि “अणोरणीयांसं” किंवा “आदित्यवर्ण तमसः परस्तात्” हीं पर्देहि गीतेंत(८.९) आणि श्वेताश्वतरोपनिषदांत एकसारखीं आहेत (श्वे.३. ९, २० ). याशिवाय गीतेंतील व उपनिषदांतीलशब्दसादृश्य म्हटले म्हणजे “सर्वभूतस्थमात्मानं”(गी.६ २९) आणि “वेदैश्च सर्वेरहमेव वेद्येो” (गी.१५.१५) ही दोन १:लोकार्धे कैवल्योपनिषदांत (कै १.१०; २. ३) जशींच्या तशींच आढळतात हें होय. परंतु या शब्दसादृश्याबद्दल जास्त विचार करण्याचे कारण नाही. गीतंतीलवेदान्त उपनिषदांच्या आधारें प्रतिपादन केला आहे याबद्दल कोणालाच शंका नाहीं. उपनिषदांतील विवेचनांत व गीतेतील विवेचनांत कांहीं फेर आहे किंवा नाहीं, आणि असल्यास कोणता, हंच मुख्यत्त्वेकरून पहाणे आहे. म्हणून आतां त्या विषयाकडे वळू.