पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/87

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ARY गीतारहरूय अथवा कमैयोग-परिशष्ट होत, अशी अद्वैत वेदान्ताचौ द्वैती सांख्यज्ञानावर नेहमींच कुरघोडी ठेवून सांख्यांचा क्षराक्षरविचार गीतेंत सांगितला आहे. उपनिषदांतील ब्रह्मात्मैक्यरूप अद्वैतमताशीं घातलेली द्वैती सांख्यांच्या ནྡྲ་ཀཱི། "ཧྰ།f| ही सांगड गीतेप्रमाणें महाभारतांतील इतर ठिकाणच्या अध्यात्मविवेचनांतहेि आढळून येत्ये, व तीवरून गीता व महाभारत हे दोन्ही ग्रंथ एकाच्याच हातचे असावेत असें जें वर अनुमान केले आहे त्यास बळकटी येत्ये. व्यक्तोपासना किंवा भक्तिमार्ग हा गातंतील उपपादनाचा उपनिषदांपेक्षां दुसरा महत्त्वाचा विशेष आहे. केवळ यज्ञयागादि कर्म ज्ञानदृष्टया भगवद्गीतेप्रमाणेच उपनिषदांतहि गौण मानिली आहेत; पण व्यक्त मानवदेहधारी ईश्वराची उपासना प्राचीन उपनिषदांतून आढळून येत नाहीं. अव्यक्त आणि निर्गुण परत्रह्माचे आकलन होणें कठिण असल्यामुळे मन, आकाश, सूर्ये, अग्नि, यज्ञ इत्यादि सगुण प्रतीकांची उपासना केली पाहिजे हें तत्त्व उपनिषत्कारांस मान्य आहे. परंतु उपासनेसाठी प्राचीन उपनिषदांतून जीं प्रतीकें सांगितली आहत त्यांत मनुष्यदेहधारी परमेश्वराच्या स्वरूपाचे प्रतीक सांगितलेले नाहीं. रुद्र, शिव, विष्णु, अच्युत, नारायण ही सर्व परमात्म्याचींच रूपें होत असें मैत्र्युपनिषदांत (मै.७.७) म्हटलें असूनश्वताश्वतरोपनिषदांत ‘महेश्वर' वगैरे शब्द आले आहेत, आणि “ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपाशैः” (श्वे.५.१३) किंवा “यस्य देवे परा भक्तिः” (श्वे.३.२३) अशीं बचनेंहि श्वताश्वतरांत आहेत. पण या वचनांतून नारायण, विष्णु इत्यादि शब्दांनीं विष्णूचे मानवदेहधारी अवतारच विवक्षित असतील असें खात्रीनें सांगतां येत नाहीं. कारण, रुद्र व विष्णु या दोन्ही देवता वैदिक म्हणजे प्राचीन असून “यज्ञो वै विष्णुः” (तै.सं.१.७ ४) इत्यादि प्रकारें प्राचीन यज्ञयागासच विष्णूच्या उपासनेचें जें स्वरूप पुढे देण्यात आले होतें, तेंच वरील उपनिषदांतून अभिप्रेत नसेल असे म्हणतां येत नाहीं तथापि मानवरूपधारी अवतारांची केल्पना तेव्हां निघालेली असावी असें कोणीं म्हटल्यास तेंहि अगदींच असंभवनाय नाही. कारण, ‘भक्ति’ असा जो श्वताश्वतरोपनिषदांत शब्द आहे तो यज्ञरूपी उपासनेस लावणें सकृद्दर्शनी युक्त दिसत नाहीं. महानारायण, नृसिंहतापनी, रामतापनी किंवा गोपालतापनी वगैरे उपनिषदांतील वचनें श्वताश्वतरोपनिषदांतील वचनांपेक्षां अधिक स्पष्ट असल्यामुळे त्यांबद्दल अशा रीतीची शंका घेण्यास जागाच रहात नाहीं हें खरें. पण या उपनिषदांचे काल निश्चितपणे ठरविण्यास कांहीं साधन नसल्यामुळे वैदिक धर्मात मानवरूपधारी विष्णूच्या भक्तीचा उदय केव्हां झाला या प्रश्नाचा या उपनिषदांवरून नीट उलगडा होऊँ शकत नाहीं. तथापि वैदिक भक्तिमागै बराच प्राचीन आहे, असें अन्य रीतीनें चांगलें सिद्ध होतें. ‘भक्तिः'-म्हणजे ज्याचे